Centennial Distribution Award to District Bank | जिल्हा बँकेला शतकोत्तर वाटचाल पुरस्कार

जिल्हा बँकेला शतकोत्तर वाटचाल पुरस्कार

ठळक मुद्देमुंबईत गौरव : सहकारक्षेत्रात नावलौकीक करून जिल्ह्यात मानाचा तुरा खोवला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्यावतीने शतकोत्तर वाटचाल पुरस्कार देवून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या अनेक योजना राबवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळून दिला. शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात बँकेने कीर्तीमान स्थापित केले. आज महाराष्ट्रातील नामवंत बँक म्हणून सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा बँकेकडे सन्मानाने पाहिले जाते. अशा या बँकेने शंभर वर्ष पूर्ण करून सहकारी क्षेत्रात परंपरा जपत चांगली सेवा दिली. त्याच कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात नस्मानित करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब थोरात, नरेश माहेश्वरी, डॉ. श्रीकांत वैरागडे आदी उपस्थित होते.

Web Title: Centennial Distribution Award to District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.