शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनाला पकडले

By admin | Updated: August 10, 2015 00:17 IST

सिहोरा आठवडी बाजारातून कामठी येथे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी पाठलाग करुन तुमसर शहरात ...

बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी केला पाठलाग : वाहनचालकालाअटक, गोहत्या बंदीवर प्रश्नचिन्ह!तुमसर : सिहोरा आठवडी बाजारातून कामठी येथे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी पाठलाग करुन तुमसर शहरात शनिवारी रात्री ८.३० वाजता पकडले. वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नऊ गार्इंना लाखनी (रेंगेपार) येथील गोशाळेत रवाना करण्यात आली आहे. जनावरांच्या मांस विक्रीवर राज्य शासनाने बंदी आणली, पंरतु सर्रास गार्इंची रवानगी कत्तलखान्याकडे नेणे सुरु आहे.सिहोरा येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात बैलबाजारही असतो. मध्य प्रदेशातील अनेक गावातील गुरु येथे खरेदी विक्रीस येतात. भंडारा जिल्ह्यातील जनावरे येथे खरेदी-विकीस आणली जातात. शनिवारी तुमसर तथा सिहोरा येथील बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनांची नाकेबंदी केली होती. सिहोरा येथील बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर तुमसर येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून एम एच ३१, डब्ल्यू. ३४१९ हे चारचाकी वाहन नऊ गायींना घेऊन निघाले असा संदेश दिला. ठवरे पुतळयाजवळ बजरंग दल पदाधिकारी योगेश बुचे, प्रमोद चावटकर, धीरज धोटे, राहुल रणदिवे, लक्ष्मीकांत बालपांडे, चेतन ढबाले, करण चौधरी, सुधिर नेमा, सचिन चौधरी यांनी वाहन थांबविले. वाहनातील गाई कुठे घेऊन जात आहे असा प्रश्न वाहनचालक मोहम्मद रफीक मोहम्मद यासीन अंसारी (४८) रा. कामठी विचारला. कामठी येथील कत्तलखान्याकडे वाहनातील गाई नेत असल्याचे वाहन चालकाने सांगितले. कार्यकर्त्यांनी थेट वाहन चालकास पोलीस ठाण्यात घेऊन गेले.तुमसर पोलिसांनी भादंवि २८९, सहकलम ११ (ड) १९०५ संरक्षक कायदा ८३/१७७ मोआका अंतर्गत गुन्हा दाखल करुन वाहनचालकास अटक केली. नंतर या गायींना लाखनी (रेंगेपार) येथील गोशाळेत पाठविण्यात आले. बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सिहोरा, तुमसर व चिचोली फाट्यावर कार्यकर्त्यांनी दूपारपासून पाळत ठेवली होती. बघेडा लेंडेझरी मार्गाने ही जनावरे कामठी येथे पोहचते केले. गोहत्या बंदीचा कायदा राज्य शासनाने मंजूर केला, परंतु राजरोसपणे कत्तलखान्याकडे गाई घेऊन जाणारी वाहने नेली जातात. येथे कायदा केवळ कागदावर दिसत आहे. सिहोरा, तुमसर ते कामठीचे अंतर किमान ६० ते ७० किमी आहे. रस्त्यात वाहने तपासणी केली जात नाही काय, असा प्रश्न असून अर्थकारणामुळे ते सर्रास सुरु आहे. कामठी येथे एकच कत्तलखाना सुरु आहे. या कत्तलखान्याला सुध्दा राजकीय पाठबळ असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)