शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बदली प्रकरणात पैसे घेणाऱ्यांची लपाछपी सुरू

By admin | Updated: April 28, 2017 00:34 IST

भंडारा जिल्हा परिषदेने केलेल्या नियमबाह्य ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द झाल्या.

प्रकरण ११७ शिक्षकांच्या बदली रद्दचे : जिल्हा परिषदेत धडकले शिक्षक प्रशांत देसाई   भंडारा भंडारा जिल्हा परिषदेने केलेल्या नियमबाह्य ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द झाल्या. या आशयाचे वृत्त गुरूवारला ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यामुळे बदलीप्रक्रियेत दिलेले पैसे परत मागण्यासाठी यातील २५ ते ३० शिक्षक जिल्हा परिषदमध्ये धडकले. ज्यांनी पैसे घेतले, त्यांना पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे पैसे घेऊन आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवले तर, अनेकांनी शहरातून बाहेर जाणे पसंत केले. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद भंडाराच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगणमत करून आर्थिक व्यवहारातून या बदल्या केल्याचे स्पष्ट झाले. बदलीत प्रकरणात अनियमितता झाल्याने ११७ शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी २१ एप्रिलला बजावले. जिल्हा परिषदने तातडीने आदेशाची अंमलबजावणी करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. गुरूवारला ‘लोकमत’ने ‘११७ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त प्रकाशित होताच बदली प्रकरणात पैसे देणाऱ्यांपैकी २५ ते ३० शिक्षक आज जिल्हा परिषदमध्ये धडकले. यात त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांना गराडा घातला. या सर्व संतप्त शिक्षकांनी डोंगरे यांना बदली प्रकरणात झालेल्या अनियमितता व पैशाने फसगत झाल्याची हकिकत कथन केली. यावर डोंगरे यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिक्षक परत गेलेत. मात्र, पैसे दिल्यानंतरही बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. यात शिक्षकांची आर्थिक फसगत झाली आहे. प्रक्रियेतील ‘दलाल’ यांना शिक्षकांनी भ्रमणध्वनी करून पैसे परत करण्याची मागणी केली. सुरूवातील या दलालांचे भ्रमणध्वनी सुरू होते. मात्र, शिक्षकांच्या त्रासाचा ससेमिरा वाढल्याने अनेकांनी भ्रमणध्वनी बंद करून ठेवले. तर अनेकांनी शहराबाहेर पळ काढला आहे. बदली प्रकरणात मोठी उलाढाल शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक येवले व निलंबित कनिष्ठ सहायक बुरडे यांनी मोठी भूमिका निभावल्याची चर्चा आता समोर येऊ लागली आहे. यासोबतच या प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकारी, सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्वांवर आता संशयाची सुई आहे. दुसरीकडे बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांनी पैसे परत मागण्याचा तगादा सुरू केल्याने अनेकांची नावे आता समोर येऊ लागली आहे. यात काही पदाधिकारी तर काहिंनी पदाधिकारी जवळचे असल्याचे बतावणी करून शिक्षकांकडून मोठी रक्कम उकळल्याचेही समोर आले आहे. बदली प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झाली याबाबत शंका नाही.