Anjali Bharti Amruta Fadnavis: जवाहरनगर (भंडारा): दोन आठवड्यांपूर्वी भंडारा तालुक्यातील फुलमोगरा अशोकनगर येथे आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध भीमगीत गायिका अंजली भारती हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषण आणि बदनामीकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी २७ जानेवारीला रात्री उशिरा अंजली भारतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत अशोकनगर / फुलमोगरा येथे १४ जानेवारीला भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केले. यात राज्याच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या भंडारा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी हेमराज नेवारे यांनी तक्रार दिली आहे. यामध्ये मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त फुलमोगरा येथेआयोजित भीम गीतांच्या कार्यक्रमात अंजली भारती (रा. नागपूर) यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना भारत सरकारविषयी अनुद्गार काढले.
या भाषणादरम्यान त्यांनी राज्याच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या कुटुंबीयांबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बदनामीकारक आणि लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरले. या प्रक्षोभक भाषणाचे व्हिडिओ इन्स्टाग्राम आयडी आणि युट्यूबवर प्रसारित करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये अंजली भारती यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक संदेश ज्ञानेश्वर वासनिक व इतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत भारतीय न्याय संहिता ७९,२२३,३५६(२), आय टी ॲक्ट ६७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील व सायबर पोलीस स्टेशन, भंडारा करीत आहेत.
Web Summary : Singer Anjali Bharti faces charges for allegedly making inflammatory statements against Amruta Fadnavis at a public event. The BJP filed a complaint, citing offensive language and social media dissemination.
Web Summary : गायिका अंजलि भारती पर एक सार्वजनिक कार्यक्रम में अमृता फडणवीस के खिलाफ कथित तौर पर भड़काऊ बयान देने के आरोप में मामला दर्ज किया गया है। भाजपा ने आपत्तिजनक भाषा और सोशल मीडिया प्रसार का हवाला देते हुए शिकायत दर्ज कराई है।