भरधाव कार शिरली पानटपरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:44 IST2018-08-20T00:44:02+5:302018-08-20T00:44:37+5:30

राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या.

The car is packed with water | भरधाव कार शिरली पानटपरीत

भरधाव कार शिरली पानटपरीत

ठळक मुद्देचालकावर गुन्हा : कारमधून ७०७ बॉटल विदेशी दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या.
नागपूरहून रायपुरकडे निघालेली भरधाव कार (सीजी ०७ एम २३८२) रविवारी दुपारी अचानक कारधा येथील एका पानटपरीत शिरली. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेने त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या कारमधून पोलिसांनी ७०७ बॉटल दारू जप्त केली. त्याची किंमत ५६ हजार रुपये आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी ही दारु कुठून आणली आणि कुठे घेऊन जात होता याचा तपास पोलीस करीत आहेत. भरदिवसा भरवस्तीतील पानटपरीत कार शिरल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातात पानटपरीचे आणि कारचेही मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती भंडारा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: The car is packed with water