शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

अनुदानाचे तुकडे पाडून संगणक खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून २०१८-१९ मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ३० मार्च २०१९ च्या पत्रान्वये कार्यालयीन आकस्मिक खर्चांतर्गत संगणक या उपशिर्षात १६ लाख ५० हजार रुपये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अनुदान वितरीत केले.

ठळक मुद्दे३४ लाखांचा निधी : आरोग्य विभागातील प्रकार, सीईओंच्या मान्यतेशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून प्राप्त ३४ लाख ३६ हजार रुपयांच्या अनुदानाचे तुकडे पाडून खरेदी करण्यात आली असून अनुदान वितरणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही मान्यता घेण्यात आली नसल्याचे दिसत आहे. यातून प्रत्येक आरोग्य केंद्राने ५० हजार रुपये किमतीचे संगणक आणि प्रिंटर खरेदी केले. मात्र यासाठी त्यांनी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस (जीईएम) प्रणालीद्वारे खरेदी न करता दरपत्रके मागवून खरेदी केली. त्यातही सर्वच्या सर्व संगणकांची किंमत सारखीच दिसून येत आहे. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून २०१८-१९ मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ३० मार्च २०१९ च्या पत्रान्वये कार्यालयीन आकस्मिक खर्चांतर्गत संगणक या उपशिर्षात १६ लाख ५० हजार रुपये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अनुदान वितरीत केले. विशेष म्हणजे सदर अनुदान वितरीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करता थेट निधी प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आला.त्यात मुख्य लेखाशिर्ष २२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य उपलेखाशिर्ष जिल्हा आरोग्य संघटनेंतर्गत धारगाव, पहेला, देव्हाडी, गोबरवाही, कोंढा, पोहरा, सरांडी आणि बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणकासाठी चार लाखांचे अनुदान वितरीत केले तर उप लेखाशिर्ष मुफसल दवाखाने अंतर्गत चुल्हाड, दिघोरी आणि पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना १ लाख ५० हजार रुपये तर उपलेखाशिर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ११ लाख रुपयांचा निधी वितरीत केला. या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जीईएम प्रणालीद्वारे निविदा मागवून संगणक खरेदी करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता दरपत्रक मागवून खरेदी केली. सदर खरेदी भंडारा शहरातील संगणक विक्रेत्यांकडून करण्यात आली. विशेष बाब म्हणजे प्रत्येक आरोग्य केंद्राने ५० हजार रुपयातच संगणक आणि प्रिंटर खरेदी केले. संगणकाची किंमत ३४ हजार ४५० रुपये आणि प्रिंटरची किंमत १४ हजार ४८० रुपये दर्शविण्यात आली. प्रत्येक आरोग्य केंद्राने याच किमतीने संगणक खरेदी केल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. आता चौकशीत काय पुढे येते याकडे लक्ष लागले आहे.संगणक व प्रिंटरची खरेदी भंडारा शहरातूनजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेल्या ५० हजार रुपयांच्या निधीतून संगणक खरेदी करण्यात आले. बहुतांश आरोग्य केंद्रांनी संगणक आणि प्रिंटर्सची खरेदी भंडारा शहरातील विविध संगणक विक्रेत्यांकडून केली आहे. विशेष म्हणजे यासाठी जीईएम प्रणालीचा वापर न करता थेट दरपत्रके मागवून खरेदी केली आणि सर्वांचे दरही सारखे असल्याचे दिसत आहे. सर्व संगणक एकाच कंपनीचे असून प्रिंटर मात्र वेगवेगळ्या कंपनीचे आहेत.जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तक्रारीवरून चौकशीजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त अनुदानातून संगणक खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुरवठादारांकडून निविदा बोलावूनच खरेदी करणे गरजेचे होते आणि सर्व प्रक्रिया जिल्हा स्तरावरच राबविण्याची गरज असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. आता चौकशी अहवालात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आरोग्य विभागातील संगणक खरेदीबाबत आपण तक्रार केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पदभार काढण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही घेण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. उलट आपल्याला पत्र पाठवून कोरोना संसर्गामुळे पदभार तुर्तास काढणे यथोचित ठरणार नाही असे सांगितले. अधिकाºयांची एकाधिकारशाही खपवून घेतली जाणार नाही. प्रभार काढला नाही तर आपणच जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसू.-रमेश डोंगरे, जिल्हा परिषद अध्यक्ष, भंडारा.नियमित प्रक्रियेअंतर्गत आरोग्य केंद्रांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. संगणकांची खरेदी मी केली नाही. त्यामुळे याबाबत मी काय सांगणार? संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आपल्या स्तरावर संगणकाची खरेदी केली आहे.-डॉ.प्रशांत उईके,जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Healthआरोग्य