शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मचारना येथे बौद्ध संमेलन

By admin | Updated: March 1, 2016 00:27 IST

तालुक्यातील मचारना जेवनाळा येथे बौद्ध संमेलन पार पडले.

भीम गितांचा कार्यक्रम : चर्चासत्रात मान्यवरांनी घेतला सहभागलाखनी : तालुक्यातील मचारना जेवनाळा येथे बौद्ध संमेलन पार पडले. याप्रसंगी गावातून धम्मरॅली काढून आनंद विहारासमोर धम्मध्वजाचे रोहण करण्यात आल्यावर भिक्खूसंघा द्वारे विहारात तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची विधिवत प्रतिस्थापना करण्यात आली. त्यानंतर भिक्खू संघाकडून उपस्थितांना धम्माबाबतचे प्रबोधन करण्यात आले.दुसऱ्या सत्रात रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते आनंद बुद्ध विहाराचे उद्घाटन करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण झाले. दुपारी २ वाजता धम्म संमेलनाला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख तुलसीराम गेडाम हे होते. मंचावर रिपब्लिकन सेनेचे काशिनाथ निकाळजे, भाई सावंत, संजिव बौधनकर मुंबई, योगेंद्र चवरे, अ‍ॅड.तेलगोटे अकोला, बाळू टेंभुर्णे गडचिरोली हे उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता भीमशंकर गजभिये यांनी प्रास्ताविकात म्हणाले, शासनमान्य बौद्धांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याने प्रत्येकाने कागदोपत्री बौद्ध नोंदवावे. तद्वतच आंबेडकरी चळवळ पूर्ववत आणण्यासाठी एक पक्ष एक नेता हे धोरण समाजाने स्वीकारावे असे आवाहन केले. यावेळी आनंदराज आंबेडकर, भाई सावंत, काशिनाथ निकाळजे, अचल मेश्राम, सभापती विनायक बुरडे आदींनी आपल्या भाषणात समता, मैत्री आणि बंधूभाव या भगवान बुद्धाच्या संदेशातून समाजाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.यावेळी माजी सभापती राजू हटनागर, शिशुपाल ढोके मचारणा, सचिन गजभिये नागपूर या दानकर्त्यांचे तसेच डी.जी. रंगारी गुरूजी साकोली यांना राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तुलसीराम गेडाम लिखीत ‘खरे बौद्ध बना’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे धम्ममंचावरून पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. धम्म संमेलनात आजूबाजूच्या गावातील दहा बारा हजार लोक उपस्थित होते. जनसमुदायाने रात्री प्रवीण भिवगडे व संच नागपूर यांच्या बुद्ध भीम सुमधूर गीतांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमासाठी नंदकुमार ढोके, यशवंत गेडाम, अनमोल ढोके, विजय सोनटक्के, मधुकर ढोके, शिवदास मेश्राम, प्रकाश ढोके, पुरुषोत्तम दहीवले, शर्मीला ढोके, भूमिता सोनटक्के, बेगन गेडाम, फुलन खोब्रागडे, वैशाली ढोके, मंगला ढवरे, देवरेषा दहिवले यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन विलास दहीवले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)