ओल्या कडपांना अंकुर फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:14 IST2017-10-22T22:13:51+5:302017-10-22T22:14:05+5:30
अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाला आधी रोगाने मारले आणि आता पावसाने. येथील शेतकºयांनी करायचे तरी काय?

ओल्या कडपांना अंकुर फुटले
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाला आधी रोगाने मारले आणि आता पावसाने. येथील शेतकºयांनी करायचे तरी काय? दिवाळी आनंदात जावी म्हणून येथील शेतकºयांनी अथक परिश्रम घेतले. पण शेवटी निसर्गाने दगा दिला. मागील दिवसात आलेल्या पावसाने बºयाच शेतकºयांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्याने धानाला अंकुर आले आहेत. काही धान हे काळे कुट्ट पडले आहेत. काही शेतकºयांचे शेतात उभे असणारे धानपिक हे जमीनदोस्त झाले आहे.
शेतकºयांचे आर्थिक बजेट ज्यावर पूर्णत: अवलंबून असते अशा शेतकºयाने अशावेळी करायचे तरी काय? मुलीचे लग्न, हातऊसणवारी देणे, अशावेळी काय करायचे? सण, उत्सवानिमित्त लागणारा पैसा कुठून आणायचा? दरवेळेला हीच समस्या राहिली तर शेतकºयांनी करायचे तरी काय?.
धानाला २८०० रूपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, ही मागणी कधी पूर्ण होणार असा प्रश्नही शेतकरी विचारीत आहेत.
अड्याळ व परिसरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झाला असला तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे बोलले जात आहे.
अड्याळ व परिसरातील शेतकरी सध्या धास्तावलेल्या स्थितीत आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे जे करायला गेले तेथे अपयशच. या आधी हलक्या आणि भारी धानावर रोगाची लागण आली असताना शेतकºयांनी त्यासाठी जे नाही ते औषध फवारणी केली होती. त्यानंतर एका पाण्याने हातची फसल जाणार म्हणून दिवसरात्र शेतात राहून शेतीला पाणी दिले आणि आता सर्व बाजू बरोबर असताना मात्र निसर्गानेच दगा दिला आणि तोंडचा घास हिरावल्यासारखे झाले. परिसरातील नेतेमंडळी यावेळी गप्प का? असे बोलल्या जाते.
दरवेळेला काही ना काही स्थिती उत्पन्न होते आणि त्याची सर्वात आधी झळ शेतकºयांना भोगावी लागते. प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन शेतकºयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी यावेळी होत आहे.