बी.टेक.च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या; साकोलीतील धक्कादायक घटनेने पालकांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:17 IST2026-02-25T13:15:48+5:302026-02-25T13:17:49+5:30
Bhandara : तालुक्यातील जमनापूर असलेल्या येथे बाजीरावजी करंजेकर इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे बी.टेक. चे शिक्षण घेत असलेल्या एका तरुण विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, २३ रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान घडली.

B.Tech student commits suicide by hanging himself; Shocking incident in Sakoli causes fear among parents
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली (भंडारा) : तालुक्यातील जमनापूर असलेल्या येथे बाजीरावजी करंजेकर इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे बी.टेक. चे शिक्षण घेत असलेल्या एका तरुण विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, २३ रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरात तसेच साकोली शहरात शोककळा पसरली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव सुरज बिरणवार (२२ वर्षे) असे असून, तो अभियांत्रिकी शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात होता, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरजने राहत्या ठिकाणी सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ होऊनही तो खोलीतून बाहेर न आल्याने सहाध्यायी व शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिस स्टेशन येथे देण्यात आली. माहिती मिळताच पीएसआय अर्जुन बेडेवार व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे हलविण्यात आला. तेथे डॉ. गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, प्राध्यापक व प्रशासनानेही दुःख व्यक्त केले आहे. तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे पालकवर्गातही चिंता व्यक्त होत आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.