नागपूरच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला; पोलीस तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 22:08 IST2025-03-20T22:08:19+5:302025-03-20T22:08:49+5:30
त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथील मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

नागपूरच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला; पोलीस तपास सुरू
भंडारा - नागपूर येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृतदेह भंडारा येथील वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. मृताची ओळख पटल्यानंतर गुरुवारी मृतदेह कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले. प्रदीप रामचंद्र शिंगाडे (६५, मनीष नगर, नागपूर), असे मृताचे नाव असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर होते.
प्रदीप शिंगाडे १७ मार्च रोजी घरून निघून गेले होते. कुटूंबियांनी नातेवाईकाकडे चौकशी केली असता ते दिसून आले नाही. त्यांनतर नागपूर येथे पोलिस तक्रार देण्यात आली. १७ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भंडारा येथील वैनगंगा नदी पात्रात आढळला. मृताची ओळख पटली नसल्याने भंडारा पोलिसांनी मृतदेह भंडारा जिल्हा रुग्णालयात ठेवले होते. अखेर मृताच्या कुटूबियांना ओळख पटल्यानंतर गुरुवार (दि.२०) शविवच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथील मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. डॉ. प्रफुल्ल बोरकर यांचे ते मामा होत.