शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

वरठीत तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: July 15, 2014 23:59 IST

उधारीचे पैसे मागितले, या कारणावरुन पाच जणांनी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गांधी वॉर्ड येथे घडली. यातील पाचही आरोपी फरार

आरोपी सराईत गुन्हेगार : पैशाच्या वादातून घडला प्रकार
वरठी : उधारीचे पैसे मागितले, या कारणावरुन पाच जणांनी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गांधी वॉर्ड येथे घडली. यातील पाचही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
विजय अंकालू कोलीयारे (२१) असे मृतकाचे नाव असून मंगेश वासनिक, सोनू वासनिक, राजेश वासनिक, शैलेश भोवते व रवी कांबळे ही फरार आरोपींची नावे आहेत. मृतक विजय हा छत्तीसगड राज्यातील असून मागील अनेक वर्षांपासून त्याचे वडिल गांधी वॉर्डात राहत आहेत. विजयने मंगेश वासनिक याला पैसे उधारीवर दिले होते. विजय व मंगेश यांच्यात काही दिवसांपासून पैसे मागण्याच्या कारणावरून वाद सुरु होता. घटनेच्या रात्री विजय व मंगेश यांच्यात दुपारपासून वाद सुरु झाला. अनेकदा झालेले भांडण इतरांच्या मध्यस्थीने मिटायचे व पुन्हा भांडण व्हायचे हा नेहमीचा प्रकार होता.
सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास विजय व त्याचा मित्र विकास मेश्राम हा मंगेश वासनिक यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले. त्यावेळी कशाचे पैसे म्हणून त्यांच्यात भांडण झाले. मंगेशने सोनू वासनिक, राजेश वासनिक, शैलेश भोवते व रवी कांबळे यांना बोलावले व विजय कोलीयारे याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी विजयचा मित्र विकास मेश्रामलाही बेदम मारहाण केली. त्यानंतर ते पाचही आरोपी फरार झाले. घटनेची माहिती विजयच्या कुटुंबांना मिळताच त्यांनी विजयला रुग्णालयात हलविले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
रात्रीपासून घटनास्थळावर तगडा पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस अधीक्षक कैलाश कणसे, पोलीस निरीक्षक मारूती शेंडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक वाकडे हे प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. वरठी पोलीस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम गभणे, इलमकर, महादेव वंजारी हे आरोपीच्या शोधात पथके रवाना केले आहेत. मृतक विजयचा भाऊ देवानंद कोलीयारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ व ४/२५ कलमान्वये गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)