शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

जंगल व नदीपात्रातून नाकाबंदी कुचकामी

By admin | Updated: October 11, 2014 01:18 IST

तुमसर विधानसभा क्षेत्र जिल्हयाचे अंतिम टोक असून मध्य प्रदेशाच्या सीमा दक्षिण दिशेने लागलेल्या आहेत.

तुमसर : तुमसर विधानसभा क्षेत्र जिल्हयाचे अंतिम टोक असून मध्य प्रदेशाच्या सीमा दक्षिण दिशेने लागलेल्या आहेत. सातपुडा पर्वतरांगा असल्यामुळे हा परिसर घनदाट वनराईने वेढलेला आहे. बावनथडी व वैनगंगा नदीने येथे सीमा निश्चित केली आहे. तुमसर-बालाघाट व तुमसर-वाराशिवनी या आंतरराज्यीय महामार्गावर हा मतदारसंघ आहे. प्रमुख मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरीही नदीपात्रातून पायवाटेने मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरु आहे.तुमसर विधानसभा मतदार क्षेत्रात मध्यप्रदेशातून सहज नदीपलीकडून प्रवेश करता येते. या मार्गाने मद्य व पैशाची खेप दाखल होते म्हणून निवडणूक आचार संहितेनंतर नाकाडोंगरी व बपेरा येथे नाकेबंदी सुरु झाली होती. पोलिसांचा खडा पहारा येथे आहे. नाकाडोंगरी येथे वनविभागाने तपासणी नाका उभा केला आहे. आंतरराज्यीय महामार्गावर नाकाबंदी सुरु असल्याने तस्करांनी आपला मार्ग जंगलातून शोधला आहे. सीमावर्ती गावातील जंगल व रस्ते या तस्करांना माहिती आहेत. नाकाबंदीमुळे वाहनातून चोरट्या मार्गाने मद्य आणि पैसा आणण्यास निश्चितच आळा बसला. मद्य व पैशाची खेप महाराष्ट्रात दाखल कशी होईल याची रणनिती तस्करांनी आखली आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा तुमसर पासुन ते नागपुर पर्यंत दिल्या आहेत. मध्यप्रदेशातील नागरिक सहज महाराष्ट्रात दाखल होतात. व्यापार व बाजाराकरिता त्यांचे येणे-जाणे आहे. सोंड्या, नाकाडोंगरी, बपेरा, हिवरा बाजार, सितेकसा, चिखली, देवनारा, आष्टी कवलेवाडा, पाथरी या मार्गाने अवैधरित्या मद्य व पैसा येण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात मद्य स्वस्त दरात मिळत असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याकरिता उमेदवार मद्याच्या सर्रास वापर करतात. चोरट्या मार्गाने समर्थकाकडून वापर चालविला आहे. बावनथडी व वैनगंगा नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. या नदीपात्राचा वापर तस्करांकडून केल्या जात आहे.वनविभागाचे नाकाडोंगरी व लेंडेझरी हे दोन वनपरिक्षेत्र या परिसरात आहेत. वनविभागाचे नाके सुध्दा जंगलात असते, परंतु मागील अनेक महिन्यापासून या जंगलव्याप्त परिसरात वनविभागाने कोणतीच ठोस कार्यवाही केल्याची दिसत नाही. वृक्षतोड, वन्यप्राणी शिकार येथे घटना घडल्या आहेत. मॅग्नीजचे अवैध उत्खनन येथे सुरुच आहे. जंगलव्याप्त परिसरात तुमसर तालुक्यातील ४५ गावे येतात. या गावांना जंगल तुडवतच गावे लागते. घनदाट जंगल असल्याने कर्मचारी सुध्दा जंगलात जाण्यास धजावत नाही. तस्कर या संधीचा फायदा घेत आहेत. पोलिसांच्या जवाबदारीसोबतच येथे वनविभागाचीही तितकीच जबाबदारी आहे. अनेक वनकर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा तक्रारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)