भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील शनिवारी मध्यरात्री एका ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर यांच्या घरावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब टाकले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही. परंतु, सचिन गाडेकर यांच्या घरातल्या आवारातल्या गाड्या जळून खाक झाल्या आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर आणि त्यांचे कुटुंब रात्री गाढ झोपेत असताना ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी गाडेकर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. घराच्या आवारात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्याचा उद्देश केवळ भीती घालणे नसून संपूर्ण कुटुंबाला इजा पोहोचवणे किंवा ठार मारणे असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी पेटवलेल्या आगीत गाडेकर यांच्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात चार दुचाकी आणि एका कारचा समावेश आहे.
या हल्ल्याबाबत माहिती देताना सचिन गाडेकर म्हणाले की, "काल रात्री अज्ञात लोकांनी आमच्यावर आत्मघाती हल्ला केला. या आगीत गाड्यांचे नुकसान झाले आहे, पण हल्लेखोरांना आमच्या कुटुंबाला इजा पोहोचवायची होती, असे वाटत आहे. कदाचित आम्हाला ठार मारण्याच्या उद्देशानेच हा पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला असावा." हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की अन्य काही कारणास्तव, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Web Summary : In Bhandara, Maharashtra, a village council member's house was attacked with petrol bombs. The family escaped unharmed, but vehicles were destroyed. Police investigate if political rivalry motivated the attack.
Web Summary : भंडारा, महाराष्ट्र में, एक ग्राम पंचायत सदस्य के घर पर पेट्रोल बमों से हमला किया गया। परिवार बाल-बाल बचा, लेकिन वाहन नष्ट हो गए। पुलिस जांच कर रही है कि क्या राजनीतिक प्रतिद्वंद्विता ने हमले को प्रेरित किया।