शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात धानाचे ५२ कोटी ७४ लाखांचे चुकारे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल भंडारा जिल्ह्यात दोन लाख ९० हजार क्विंटल धान विक्री

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गाशी दोन हात करीत पिकविलेला धान आधारभूत केंद्रावर विकला, मात्र आता महिना झाला तरी धान विक्रीचा एक छदामही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली असून त्याची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार ३४३ रुपये आहे. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
भंडारा जिल्ह्यात ६६ आधारभूत धान खरेदी केंद्रावर १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आधारभूत केंद्रावर आपला धान आणून विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांला धान विक्रीचे पैसे मिळाले नाहीत. आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर घरी आलेला धान विकला. परंतु आता त्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. भंडारा तालुक्यातील २९१ शेतकऱ्यांना नऊ हजार ५६४ क्विंटल धान विकला असून त्याची रक्कम एक कोटी ७३ लाख ५८ हजार ६०० रुपये आहे. मोहाडी तालुक्यातील एक हजार ८४ शेतकऱ्यांनी ३५ हजार ८९१ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत सहा कोटी ५१ लाख ४२ हजार ८२८ रुपये, तुमसर तालुक्यातील एक हजार ५९० शेतकऱ्यांनी ५४ हजार ९४७ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत नऊ कोटी ९७ लाख ३० हजार ७५ रुपये, लाखनी तालुक्यातील एक हजार ७६१ शेतकऱ्यांनी ६२ हजार ४७२ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत ११ कोटी ३३ लाख ८७ हजार २२४ रुपये, साकोली तालुक्यातील एक हजार ४५९ शेतकऱ्यांनी विकलेल्या ५२ हजार ८६९ क्विंटल धानाचे नऊ कोटी ५९ लाख ५७ हजार ५९८ रुपये, लाखांदूर तालुक्यातील एक हजार १५६ शेतकऱ्यांनी ४६ हजार २४५ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत आठ कोटी ३९ लाख ३७ हजार २१६ रुपये आहे. पवनी तालुक्यातील ७३५ शेतकऱ्यांनी २८ हजार २६१ क्विंटल धान आधारभूत केंद्रावर विकला असून पाच कोटी १९ लाख ४७ हजार ८४१ रुपये किंमत होते. २ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे.
गत महिनाभरापासून शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकत आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून नवीन अधिकारी रूजू झाले. परंतु त्यानंतरही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. शेतकरी पैशाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

६६ केंद्रावर केवळ सर्वसाधारण धानाची खरेदी
जिल्ह्यातील ६६ आधारभूत धान खरेदी केंद्रावर केवळ सर्वसाधारण धानाचीच शेतकरी विक्री करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अ ग्रेडचे धान विक्रीस आले नाही. अ ग्रेडच्या धानाला खुल्या बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवित असल्याचे दिसत आहे. त्यातही वेळेवर पैसा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी