लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एका नवजात बाळाला २ लाखांपेक्षा जास्त किमतीत विक्री प्रकरणात डॉ. नितेश वाजपेयी याच्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. याच टोळीने दुसरे बाळ ४ लाख ४० हजारांनी विकल्याची बाब तपासात समोर आली आहे. वरठी पोलिसांनी मोहगाव (देवी) येथे शनिवारला मध्यरात्रीच्या सुमारास बाळ ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाळ तस्करी प्रकरणातील सूत्रधार डॉ. नितेश वाजपेयी याने डिसेंबरमध्ये मोहदुरा येथील एका जोडप्याला बाळ विकल्याचे निश्चित झाल्यानंतर, भंडारा येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाळाचा ताबा घेतला.
डॉ. नितेश वाजपेयी याला १९ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे, हे उल्लेखनीय. बाळ तस्करी प्रकरणातील आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली, साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Web Summary : In Bhandara, India, Dr. Nitesh Vajpayee and accomplices were arrested for selling babies. They sold a second baby for approximately $5,700. Police recovered the child, admitting them to a hospital. An investigation is underway, led by police officials.
Web Summary : भंडारा में, डॉ. नितेश वाजपेयी और साथियों को बच्चे बेचने के आरोप में गिरफ्तार किया गया। उन्होंने दूसरा बच्चा लगभग 4.70 लाख रुपये में बेचा। पुलिस ने बच्चे को बरामद कर अस्पताल में भर्ती कराया। पुलिस अधिकारी जांच कर रहे हैं।