भंडारा बाळ विक्री प्रकरण : वाजपेयीने दुसरे बाळ विकले ४.७० लाख रुपयांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:43 IST2026-02-23T13:39:25+5:302026-02-23T13:43:28+5:30
Bhandara : वरठी पोलिस स्टेशन हद्दीतील मोहगाव (देवी) येथून बाळ घेतले ताब्यात

Bhandara baby sale case: Vajpayee sold another baby for Rs 4.70 lakh
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एका नवजात बाळाला २ लाखांपेक्षा जास्त किमतीत विक्री प्रकरणात डॉ. नितेश वाजपेयी याच्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. याच टोळीने दुसरे बाळ ४ लाख ४० हजारांनी विकल्याची बाब तपासात समोर आली आहे. वरठी पोलिसांनी मोहगाव (देवी) येथे शनिवारला मध्यरात्रीच्या सुमारास बाळ ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाळ तस्करी प्रकरणातील सूत्रधार डॉ. नितेश वाजपेयी याने डिसेंबरमध्ये मोहदुरा येथील एका जोडप्याला बाळ विकल्याचे निश्चित झाल्यानंतर, भंडारा येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाळाचा ताबा घेतला.
डॉ. नितेश वाजपेयी याला १९ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे, हे उल्लेखनीय. बाळ तस्करी प्रकरणातील आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली, साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.