आॅनलाईन लोकमतभंडारा : तथागत गौतम बुद्ध यांनी दु:खमुक्तीचा आणि मानव कल्याणाचा मार्ग समस्त मानव जातीला दाखवला. याच मार्गाचे म्हणजे धम्माचे आचरण करुन आपण सुजाण नागरिक बना, असे आवाहन भदंत संघधातू यांनी केले.तालुक्यातील कोकणागड नागार्जुन परिसरातील मुलगंध कुटी, नागटेकडी येथे आयोजित धम्म मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा नगर परिषदेचे नगरसेवक आशु गोंडाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अमृत बन्सोड, धारगाव जिल्हा परिषदेचे सदस्या निलकंठ कायते, अॅड. अमन चवरे, सामाजिक कार्यकर्ता मंगेश हुमणे, आय. जी. बन्सोड, महेंद्र वाहणे, संजय बन्सोड, प्राणहंस मेश्राम, भन्ते आनंद प्रामुख्याने उपस्थित होते.मेळाव्याच्या प्रथम सत्रात बुद्ध वंदना, भन्ते संघधातू यांची धम्मदेशना व भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आले. दुसºया सत्रात समाजप्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी महाकारुणिक गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या प्रतिमांना अतिथींनी अभिवादन केले.याप्रसंगी डॉ. खंडारे आणि इंदूताई गोंडाणे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.तिसºया सत्रात प्रबोधनकार हरिश्चंद्र लाडे यांचा संगीतमय धम्मप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. मुलगंध कुटी नागटेकडी बहुउद्देशिय संस्था कोकणागड तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे संचालन हरिश्चंद्र लाडे , तर आभार विणेला कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी समता सैनिक दल आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
धम्माचे आचरण करून सुजाण बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:49 IST
तथागत गौतम बुद्ध यांनी दु:खमुक्तीचा आणि मानव कल्याणाचा मार्ग समस्त मानव जातीला दाखवला. याच मार्गाचे म्हणजे धम्माचे आचरण करुन आपण सुजाण नागरिक बना, असे आवाहन भदंत संघधातू यांनी केले.
धम्माचे आचरण करून सुजाण बना
ठळक मुद्देभदंत संघधातू यांचे आवाहन : कोकणागड येथील नागटेकडीवर धम्म मेळावा