शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा

By admin | Updated: February 25, 2016 00:28 IST

नोकरीमध्ये काम करताना खूप बंधने येतात. पण उद्योगामध्ये तुम्हाला नवनवीन कल्पना वापरता येतात. उद्योगाला किती वेळ द्यायचा, त्याला किती मोठे करायचे, हे तुमच्या हातात असते.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनभंडारा : नोकरीमध्ये काम करताना खूप बंधने येतात.  पण उद्योगामध्ये तुम्हाला नवनवीन कल्पना वापरता येतात. उद्योगाला  किती वेळ द्यायचा, त्याला किती मोठे करायचे, हे तुमच्या हातात असते.  म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही नोकरी करण्यापेक्षा उद्योग उभारा आणि उद्योजक बना,  असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. भंडारा पॅरामेडिकल महाविद्यालयात  प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी  प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यना ते  संबोधित करीत होते. यावेळी   रोजगार व स्वयंरोजगार चे सहायक संचालक बालाजी मरे,  संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल कुर्वे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, चैताली कुर्वे, यावेळी उपस्थित होते. यावेळी ब्राइडल  मेकअप, आणि डी.एम.एल.टी., नर्सिंग  या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे फीत कापून उदघाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या देशात कौशल्याची खूप कमतरता आहे. पदविका, पदवी घेतलेल्या तरुणांमध्ये मूलभूत माहिती नसते.  आजच्या तरुणांना अनेक क्षेत्रात संधी आहेत. पण यश मिळविण्यासाठी तुमच्यामध्ये समर्पण, निर्धार, शिस्त, आणि सातत्य असले पाहिजे. आज जास्तीत जास्त टॅलेंट हे खेड्यातून येत आहे. त्यामुळे तुम्ही खेड्यातले आहात याबद्दल कमीपणा वाटून घेऊ नका.  तुमच्यातल्या ऊर्जेला योग्य मार्ग दाखविल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या आवाजापेक्षा तुमच्या यशाचा आवाज जास्त असला पाहिजे, असेही ते विद्यार्थ्यांना म्हणाले. यावेळी बालाजी मरे यांनी प्रास्ताविकातून प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यामधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि उद्योगासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी बँकांशी समन्वय करुन दिला जातो.  जिल्ह्यात कोहिनूर  टेकनिकल इन्स्टिट्यूटमध्येसुद्धा मोबाइल दुरुस्ती, कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षण उपलब्ध आहे.  त्यामुळे विद्यार्थांनी अधिक माहितीसाठी रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात संपर्क साधावा. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी  विद्यार्थी उपस्थित होते.  (शहर प्रतिनिधी)