शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

भरधाव ट्रेलरने बालकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:00 AM

प्रथमेश हा दररोज मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी सायकलने जात असे. गुरुवारही तो मित्र अमोलसोबत सायकलने गेला होता. सिरसी गावाजवळील राज्य मार्गावर मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने सायकलला धडक दिली. यात मागेबसलेला प्रथमेश हा ट्रेलरच्या चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायकल चालवित असलेला अमोल हा थोडक्यात बचावला.

ठळक मुद्देवरठी-भंडारा राज्यमार्गावरील घटना : ओव्हरलोड वाहतुकीचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सायकलने पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या एका ११ वर्षीय बालकाला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. यात दाभा येथील प्रथमेश रवींद्र गायधने याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्याचा मित्र अमोल धनीराम पेठकर हा थोडक्यात बचावला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.५० वाजताच्या सुमारास वरठी - भंडारा राज्य मार्गावरील सिरसी गावाजवळ घडली. अपघातानंतर ट्रेलर चालकाने घटनास्थळाहून पळ काढला.प्रथमेश हा दररोज मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी सायकलने जात असे. गुरुवारही तो मित्र अमोलसोबत सायकलने गेला होता. सिरसी गावाजवळील राज्य मार्गावर मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने सायकलला धडक दिली. यात मागेबसलेला प्रथमेश हा ट्रेलरच्या चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायकल चालवित असलेला अमोल हा थोडक्यात बचावला. सायकलचा अक्षरश: चुराडा झाला. प्रथमेश हा भंडारा येथील शाळेत इयत्ता सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होता. तर अमोल हा वरठी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. प्रथमेश हा ओव्हरलोड वाहतूकीचा बळी ठरला. या वाहतूकीमुळे रस्ते जीवघेणे ठरत आहे.घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. बी. ताजने ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवून ठेवला होता. त्यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, दाभाचे सरपंच मधुकर नागपूरे, प्यारेलाल वाघमारे यांनी घटनास्थळी जावून नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या. आमदार भोंडेकर यांनी ट्रेलर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या कुटुंबिला मोबदला दयावा अशी मागणी केली. या संदर्भात आमदार कारेमोरे यांनी न्याय देण्यासाठी योग्य ती करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहे.प्रथमेशचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता दाभा येथे पोहचताच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.गायधने यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रेलरचालकावर भांदविच्या२७९, ३०४, १३४ व १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक एस. बी. ताजणे करीत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात