Baby trailer crush on baby | भरधाव ट्रेलरने बालकाला चिरडले
भरधाव ट्रेलरने बालकाला चिरडले

ठळक मुद्देवरठी-भंडारा राज्यमार्गावरील घटना : ओव्हरलोड वाहतुकीचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : सायकलने पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या एका ११ वर्षीय बालकाला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. यात दाभा येथील प्रथमेश रवींद्र गायधने याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्याचा मित्र अमोल धनीराम पेठकर हा थोडक्यात बचावला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.५० वाजताच्या सुमारास वरठी - भंडारा राज्य मार्गावरील सिरसी गावाजवळ घडली. अपघातानंतर ट्रेलर चालकाने घटनास्थळाहून पळ काढला.
प्रथमेश हा दररोज मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी सायकलने जात असे. गुरुवारही तो मित्र अमोलसोबत सायकलने गेला होता. सिरसी गावाजवळील राज्य मार्गावर मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने सायकलला धडक दिली. यात मागेबसलेला प्रथमेश हा ट्रेलरच्या चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायकल चालवित असलेला अमोल हा थोडक्यात बचावला. सायकलचा अक्षरश: चुराडा झाला. प्रथमेश हा भंडारा येथील शाळेत इयत्ता सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होता. तर अमोल हा वरठी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. प्रथमेश हा ओव्हरलोड वाहतूकीचा बळी ठरला. या वाहतूकीमुळे रस्ते जीवघेणे ठरत आहे.
घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. बी. ताजने ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवून ठेवला होता. त्यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, दाभाचे सरपंच मधुकर नागपूरे, प्यारेलाल वाघमारे यांनी घटनास्थळी जावून नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या. आमदार भोंडेकर यांनी ट्रेलर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या कुटुंबिला मोबदला दयावा अशी मागणी केली. या संदर्भात आमदार कारेमोरे यांनी न्याय देण्यासाठी योग्य ती करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहे.
प्रथमेशचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता दाभा येथे पोहचताच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गायधने यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रेलरचालकावर भांदविच्या२७९, ३०४, १३४ व १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक एस. बी. ताजणे करीत आहे.
 

Web Title: Baby trailer crush on baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.