लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाळ विक्री प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मालती वाघमारे या महिलेला अटक करण्यात यश आले आहे. उघड झालेल्या या प्रकरणातील पहिल्या बाळाची तिने खरेदी केली होती.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार डॉ. नितेश वाजपेयी याच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यालाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासात मुळापर्यंत जायचे असल्याने पोलिसांनी न्यायालयापुढे ११ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
डॉक्टरने केलेल्या आरोपांची चौकशी करू
डॉक्टर वाजपेयी याने, पोलिसांकडून आणि मीडियाकडून मोठ्या रकमेची मागणी झाल्याचे आरोप केले आहेत. माध्यमांचा हवाला देऊन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही पोलिसांवर जाहीर आरोप केले आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता, या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर चौकशी केली जाईल. या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावी, असे आवाहन नुरूल हसन यांनी केले.
दुसऱ्या बाळाच्या पालकाचा तपास सुरू
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांची पत्रकार परिषदेत म्हणाले, डॉ. नितेश वाजपेयी याने सागर शिक्का या मध्यस्थाच्या माध्यमातून दुसऱ्या बाळाची विक्री केल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. आता त्या बाळाच्या पालकांचा शोध सुरू आहे.डॉ. वाजपेयीने आपल्या गोंदियातील रुग्णालयातून रॅकेट चालविल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या हॉस्पिटलमध्ये लगतच्या मध्य प्रदेशातील लोकांचे येणे-जाणे असायचे. त्यावरून आंतरराज्यीय संबंधाची शक्यता नाकारता येत नाही. तपासात दत्तक संबंधी कागदपत्रे आढळली नाहीत. मात्र, व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगवरून आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे आहेत.
रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी पत्र
डॉ. वाजपेयी याच्या रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी पोलिसांनी गोंदियाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र दिले आहे. कागदपत्रांवरून या डॉक्टरच्या डिग्रीबद्दलही शंका घेतली जात आहे.या डॉक्टरने २०१७ ते २०२२ या काळात विदेशातून एमबीबीएस केले आहे. मात्र, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन केव्हा दिली, याबद्दल स्पष्टता नाही.
Web Summary : Police arrested a woman who bought a baby in the child trafficking case. Doctor's police custody extended for further investigation into inter-state links and financial transactions. Authorities are searching for the parents of the second child and investigating allegations against the doctor.
Web Summary : बाल तस्करी मामले में पुलिस ने एक बच्चे को खरीदने वाली महिला को गिरफ्तार किया। अंतरराज्यीय संबंधों और वित्तीय लेनदेन की आगे की जांच के लिए डॉक्टर की पुलिस हिरासत बढ़ाई गई। अधिकारी दूसरे बच्चे के माता-पिता की तलाश कर रहे हैं और डॉक्टर के खिलाफ आरोपों की जांच कर रहे हैं।