शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदच्या एम.डी.एन.एस. डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे कायदेशीर अधिकार

By admin | Updated: June 25, 2014 00:16 IST

आयुर्वेद युनानी डॉक्टरांना आधुनिक चिकित्साशास्त्र अर्थात मॉडर्न मेडीसीन ही प्रचार पद्धत वापरण्याच्या परवानगीला तब्बल ४१ वर्षानंतरच्या लढाईनंतर कायद्याचे संरक्षण मिळाले. त्यामुळे यापुढे आयुर्वेद

शिक्कामोर्तब : आयुर्वेद, युनानी डॉक्टरांसाठी ४१ वर्षांनी कायद्यात तरतूद
अड्याळ : आयुर्वेद युनानी डॉक्टरांना आधुनिक चिकित्साशास्त्र अर्थात मॉडर्न मेडीसीन ही प्रचार पद्धत वापरण्याच्या परवानगीला तब्बल ४१ वर्षानंतरच्या लढाईनंतर कायद्याचे संरक्षण मिळाले. त्यामुळे यापुढे आयुर्वेद युनानीच्या सर्व वैद्यक शाखेच्या डॉक्टरांना ही उपचार पद्धत वापरण्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
विधिमंडळात या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन त्याबाबत महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट १९६१ चया कायद्यातील कलम २५ मध्ये ४ व ५ या उपकलमांचा समावेश करण्यात आला आहे.
त्या संदर्भातील अ‍ॅक्ट मान्य करुन जाहीर करण्यात आला आहे. या तरतुदीमुळे आयुर्वेद युनानीच्या ८२ हजार डॉक्टरांना लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. आयुर्वेद युनानीच्या डॉक्टरांना मॉडर्न मेडीसीनची उपचार पद्धत वापरण्यासाठी १९७३ पासून मागणी होत होती. त्यामागणीची दखल घेऊन १९९२ साली तत्कालीन आरोग्यमंत्री पुष्पा हिरे यांनी अध्यादेश जारी करुन परवानगी दिली होती.
मात्र त्याला कायद्याचे संरक्षण लाभले नव्हते. त्यामुळे १९९९ मध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री दौलतराव अहेर यांनी औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या अंतर्गत दुसरा अध्यादेश जारी केला. महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर्स १९६१ च्या कायद्यात या उपचारपद्धती वापरण्याबाबतच्या परवानगीचा समावेश नसल्याने संरक्षण मिळाले नव्हते.
त्या लढाईला विधीमंडळात मान्यता मिळाली. त्यामुळे आयुर्वेद युनानीच्या डॉक्टरांना मॉडर्न मेडीसीनची प्रॅक्टीससाठी कायदेशीर संरक्षण मिळाले आहे, अशी माहिती पवनी तालुका निमा संघटनेचे सचिव डॉ. विजय करंजेकर यांनी दिली. (वार्ताहर)