शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जागृतीच्या राज गायकवाड याच्या पत्नीला अटक

By admin | Updated: June 30, 2016 00:14 IST

फसवणूक प्रकरण : भंडारा पोलिसांची कारवाई

सांगली : भंडारा जिल्ह्यातील मोगरा (शिवणी) येथील एकाची साडेअकरा लाखाला फसवणूक केल्याप्रकरणी जागृती अ‍ॅग्रो फूडस्चा सर्वेसर्वा राज गायकवाड याची पत्नी जई गायकवाड (वय ३८, रा. वखार भाग, सांगली) हिला बुधवारी भंडारा पोलिसांनी सांगलीत अटक केली. शेळीपालनात गुंतवणूक करून लाभाचे आमिष दाखवित फसवणूक केल्याचा गुन्हा लाखणी (जि. भंडारा) येथे दाखल झाला होता. याबाबत लाखणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले की, मोगरा येथील विजय महादेव खोब्रागडे यांनी सांगलीतील जागृतीचा अध्यक्ष राज गायकवाड, संचालक जई गायकवाड, विदर्भातील संचालक प्रशांत सोनारे, भंडाऱ्यातील संचालक प्रज्ञाशील रोगडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रोगडे याला अटक करण्यात आली, तर जई गायकवाड ही तीन महिन्यांपासून फरारी होती. तिला बुधवारी सांगलीतून अटक करण्यात आली आहे. गायकवाड याच्या सोनारे व रोगडे या संचालकांनी खोब्रागडे यांना अ‍ॅग्रो फूडस्च्या शेळीपालन व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी एजंटही नेमले होते. या व्यवसायात शेतकऱ्याने एक शेळी दिल्यास १४ महिन्यानंतर पाच हजार व दहा महिन्यानंतर चाळीस हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले. खोब्रागडे यांची जमीन भाड्याने घेऊन त्यांना दहा लाख रुपये गुंतविण्याचे आमिष दाखविले. त्या बदल्यात त्यांना टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले होते. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खोब्रागडे यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. यात पोलिसांनी रोगडे याला अटक केली आहे, तर उर्वरित संशयित फरारी होते. जई गायकवाड ही सांगलीत असल्याची माहिती मिळताच तिचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आल्याचे निरीक्षक चकाटे यांनी सांगितले. तिला घेऊन पोलिसांचे पथक भंडाऱ्याला रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)