शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यापेक्षा आळा घाला

By admin | Updated: February 10, 2017 00:34 IST

अंधश्रध्देत ग्रासलेल्या व्यसनाधीन उध्दार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा, साधू, महंत महाराज यांचे चमत्कारावर विश्वास न ठेवता

मुनीर शेख यांचे प्रतिपादन : उमरी येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमचिचाळ : अंधश्रध्देत ग्रासलेल्या व्यसनाधीन उध्दार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा, साधू, महंत महाराज यांचे चमत्कारावर विश्वास न ठेवता वर्षानुवर्षे पोखरुन टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करावयाची असेल तर महान तयागी बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्म शिकवणीचा प्रचार प्रसार करणे अत्यंत काळाची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख यांनी केले. उमरी येथील व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उमरीच्यावतीने व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक दामोधर जिभकाटे प्रमुख अतिथी म्हणून जयदेव निखारे, मुनिर शेख, देवा भुजाळे, टिकाराम नाव्होकर, अशोक मोहरकर, प्रकाश हातेल, विक्की पचारे, मोहन हरडे, गोपाळा भुजाळे, सरपंचा उमरी शिला चौधरी, आशा भोयर, श्रीहरी गेडेकर, विठ्ठल भुजाडे, मधुकर गडेकर, ताराचंद दहिलकर, गजानन मलोडे, वैशाली भुजाडे, वनिता भुजाडे, कमला दहिलकर, संगिता मलोडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भगवान हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन गावातून रॅली काढून रॅलीमध्ये व्यसन मुक्तीचे संदेशाची घोषणा करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुनिर शेख म्हणाले महानत्यागी बाबा जुमदेवजीने अंधश्रध्देने ग्रासलेल्या व व्यसनाधिन कुटूंबाची दारु, सट्टा, जुवा, गाजा आदी वाईट व्यसन हद्दपार करुन शासनाला नाही जमले ते महानत्यागी बाबा जुमदेवजीने मानव धर्माची स्थापना करुन दारुबंदी करुन मद्यप्राशन करणाऱ्या कुटूंबाचे उध्दार केले. त्या महानत्यागी बाबा जुमदेवजीची शासन स्तरावर जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याचे शासनाने दखल घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोधर जिभकाटे यांनी बाबानी दिलेले चार तत्व, तिन शब्द, पाच नियमाची उपस्थितांना प्रचित करुन दिली तर देवा भुजाडे यांनी बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करुन सन १९४९ ला मानवधर्माची स्थापना करुन मानवाचा जीवन सफल करण्यासाठी बाबानी चार तत्व, तीन शब्द व पाच नियम दिले. बाबा अंधश्रध्देचा विरोध करीत असत बाबा कोणत्याही सेवकांकडून गुरुदक्षिणा घेत नसत व प्रत्येक आत्म्यात परमेश्वर असल्याने ते पाया पडू देत नव्हते. बाईला तर फार लांब उभे ठेवत असत बाबा नेहमी सत्कर्म करीत असत व सेवकांनाही सत्कर्म करावयास सांगत भगवंताने मानवाला निर्माण केल्याने आपल्या सर्वांचा विधाता एक भगवान आहे, असे सांगत परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी शारीरिक दु:खा बरोबर त्यांनी त्यांचे मानसिक आर्थिक सामाजिक दु:खही दूर झाले असल्याचे म्हणाले. संचालन ताराचंद दहेलकर आभार मोहन गडेकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुरी भुजाडे, काशीराम मलोडे, विजय भुजाडे, वंदना चिंचोलकर, माधूरी भुजाडे, अजय भोयर, रामलाल मलोडे, दिनेश भोयर, बळीराम मलोडे व सेवक सेविका यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)