कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न; व्यापाऱ्यांनी चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 13:30 IST2019-02-17T13:29:01+5:302019-02-17T13:30:27+5:30
व्यापाऱ्यांनी पकडून दरोडेखोरांना बेदम चोप दिला असून एका तरुणास पोलिसांच्या हवाली केले आहे.

कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न; व्यापाऱ्यांनी चोपले
भंडारा : तुमसर येथील कापड दुकानात शिरून चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुमसर येथे रविवारी सकाळी ११.३० वाजताची घटना घडली.
व्यापाऱ्यांनी पकडून दरोडेखोरांना बेदम चोप दिला असून एका तरुणास पोलिसांच्या हवाली केले आहे. तर त्याचा साथीदार पसार झाला आहे.
विकास उर्फ दुबली दलीराम गिल्लोरकर (34) रा. कुंभारेनगर, तुमसर असे आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता.