शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धानाचे क्षेत्र २७ हजार हेक्टरने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

भंडारा : नैसर्गिक संकटाचा कितीही सामना करावा लागला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे धानपिकाशिवाय पर्याय नाही. विविध पिकांचे प्रयोग केल्यानंतरही शेतकरी ...

भंडारा : नैसर्गिक संकटाचा कितीही सामना करावा लागला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे धानपिकाशिवाय पर्याय नाही. विविध पिकांचे प्रयोग केल्यानंतरही शेतकरी काहीही झाले तरी धानाचीच निवड करीत असल्याचे दिसते. यंदा तर धानाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा २७ हजार हेक्टरने वाढ होणार आहे. गतवर्षी एक लाख ८७ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी दोन लाख १४ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन आहे.

भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो. भातपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार हेक्टर असून, यावर्षी यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. धानपिकातून गत काही वर्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. धान लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध समस्या आणि नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. विक्रीसाठीही शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. पणन महासंघ धानाची खरेदी करीत असले तरी वेळेवर पैसे मिळेल याची कोणतीही खात्री नसते. अनेक संकटे येऊनही शेतकरी मात्र दरवर्षी खरीप हंगाम आला की धानाचा विचार करताना दिसतो. अलीकडे भाजीपाला, सोयबीन, तूर पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांचा कल मात्र परंपरागत धानपिकाकडे दिसून येतो.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख २७ हजार ९१ हेक्टरवर पिकांची लागवड होणार आहे. त्यात भातपिकाचे क्षेत्र दोन लाख १३ हजार ८३७ हेक्टर, तूर ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्टर आणि कापूस ८०० हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त असून, नर्सरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

बाॅक्स

धानपिकालाच शेतकऱ्यांची पसंती

मुबलक पाऊस आणि सिंचनाची सुविधा असल्याने परंपरागत धानपिकालाच जिल्ह्यातील शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. वर्षानुवर्ष धानाची शेती केली जात आहे. त्यामुळे नवीन पीकपद्धतीत फायदा होईल की नाही याची खात्री नसते. धानाबाबत खात्री असल्याने शेतकरी काहीही झाले तरी धान पिकवतो. नगदी पिकापेक्षा धानपीकच शेतकऱ्यांना महत्त्वाचे ठरते.

बाॅक्स

प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. तांदूळ निर्मिती हा प्रमुख घटक असला तरी धानापासून इतरही खाद्यपदार्थ तयार करता येतात. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. जिल्ह्यात केवळ राइस मिल असून, तेथे धानापासून तांदूळ तयार केले जातात. परंतु पोहे, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योग येथे सुरू झाल्यास शेतकऱ्यांना धानशेतीतून दोन पैसे उरण्याची शक्यता आहे.