शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

वैनगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी पवनी येथे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:01 IST

नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयुवाशक्ती संघटना : नाग नदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. नागनदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवून वैनगंगा नदी प्रदूषित होण्यापासून वाचवा अशी मागणी करण्यात आली.नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नाग, कन्हान नदीद्वारे आंभोरा येथे अन्य चार नद्यांसह वैनगंगा नदीला मिळते. नागनदीमध्ये शहरातील सांडपाणी, कारखान्यातील रसायनयुक्त पाणी येते. तेच पाणी वैनगंगा नदीत मिसळते. नागपूर शहरातून दररोज ४२० दशलक्ष लिटर प्रतीदिन सोडले जाते. त्यापैकी नागपूर शहराजवळील भांडेवाडी येथे ८० दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते तर उर्वरीत पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. नागनदीचे पाणी पूर्णपणे काळ्या रंगाचे असून त्याची दुर्गंधी येते. त्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. गोसेखुर्द धरणात २००९ पासून पाणी संचय सुरु आहे. नागनदीचे पाणी येथे थोपवून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.प्रदूषित नागनदी मिश्रीत वैनगंगा नदीच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढले असून गोसीखुर्द धरणातील पाण्यातील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनाही विविध आजार जडत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पवनी येथे वैनगंगा नदीपात्रात देवराज बावनकर यांच्या नेतृत्वात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवराज बावनकर, प्रशांत मोहनकर, दीपक बावनकर, सुनील हटवार, जयपाल वंजारी, मच्छींद्र हटवार, लिलाधर काटेखाये, योगेश बावनकर, गोपाल काटेखाये, सोनू समरीत, भगवान शेंडे, उमेश मोहरकर, लतीराज वाघमारे, मंगला बावनकर, भाग्यश्री येलमुले, आकाश हटवार, राहुल नंदनवार, अंकोश सावरकर, रवींद्र जांभोरकर, अभय लांजेवार, रुपलता वंजारी, कीर्ती काटेखाये, रेखा नागपुरे, लिना बावनकर आदी सहभागी झाले होते.पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदननागपूर शहरातून येणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात उपाययोजना करावी यासाठी युवाशक्ती संघटनेने अर्धदफन आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना तहसील प्रशासनामार्फत निवेदन पाठविले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :riverनदी