लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह सहाव्या वेतन आयोगातील त्रुट्या दूर करुन सातव्या वेतन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ जिल्हा भंडाराने केली आहे.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मागण्यांच्या पाठपुरावा संदर्भात मागील वर्षी मुंबई येथे धरणे दिले होते. त्यानंतर दिल्ली येथे देशव्यापी धरणे आंदोलनही उभारण्यात आले होते. तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही मागण्यांची तिव्रता राज्य शासनाच्या लक्षात आणून दिली होती. मात्र कारवाई झाली नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी संघाची मुख्य मागणी आहे. प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात सहाव्या वेतन आयोगातील त्रुट्या दूर करुन सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणीही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, ज्ञानेश्वर दमाहे, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, आदेश बोंबार्डे, भगवान गायधने, बी. डी. सेलोकर, सुनिल भालाधरे उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:44 IST
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह सहाव्या वेतन आयोगातील त्रुट्या दूर करुन सातव्या वेतन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ जिल्हा भंडाराने केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करा
ठळक मुद्देनिवेदन : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची मागणी