शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध वडिलांवर कुऱ्हाडीचा घाव घालून मुलाने केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहतात. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड घेऊन आला. कोणताही विचार न करता त्याने थेट जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केले.जानबा गोगलू मेश्राम (७०) असे मृत वडिलांचे नाव आहे. तर देवेंद्र जानबा मेश्राम (३३) असे आरोपी मुलाचे नाव आहे. जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहतात. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड घेऊन आला. कोणताही विचार न करता त्याने थेट जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. घाव वर्मी बसल्याने जानबा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि मृत्युमुखी पडले. घरी एकच आरडाओरडा झाला त्यावेळी पाहुणी म्हणून आलेली त्याची बहीण श्यामकला शहारे रा. महागाव ही मध्ये आली. त्यावेळी तिलाही मारहाण केली. या घटनेची गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपी देवेंद्रला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३२३ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. शनिवारी जानबा मेश्राम यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी साकोली येथे करण्यात आली. त्यानंतर सोनमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

पाहुणी आलेल्या बहिणीलाही मारहाण- देवेंद्र मेश्राम याची बहीण तालुक्यातील महागाव येथून पाच दिवसापूर्वी उन्हाळ्याच्या पाहुणपणासाठी माहेरी सोनमाळ येथे आली होती. वडिलाचा तिच्या डोळ्यादेखत खून झाला. भावाला जाब विचारताच त्याने बहिणीच्या डोक्याचे केस पकडून तिच्या गालावर व पाठीवर लाथा बुक्याने मारहाण केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस