विवाह चित्रपटातील ही छोटी आता झाली मोठी, साडीतले हॉट फोटो होताहेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 19:10 IST2022-09-29T19:10:15+5:302022-09-29T19:10:48+5:30
Amrita Prakash: विवाह चित्रपटात शाहीद कपूर आणि अमृता राव यांच्यासोबतच ज्या अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं ती अभिनेत्री होती अमृता प्रकाश.

विवाह चित्रपटातील ही छोटी आता झाली मोठी, साडीतले हॉट फोटो होताहेत व्हायरल
मुंबई - विवाह हा बॉलिवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात भारतीय संस्कृतीमधील विवाह सोहळ्याचं सुंदरपणे चित्रिकरण करण्यात आलं आहे. या चित्रपटातील शाहीद कपूर आणि अमृता राव यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र या चित्रपटात शाहीद कपूर आणि अमृता राव यांच्यासोबतच ज्या अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं ती अभिनेत्री होती अमृता प्रकाश.
अमृता प्रकाश हिने या चित्रपटात अमृता राव हिच्या बहिणीची भूमिका केली होती. आता अमृता प्रकाश मोठी झालीय. तसेच ती खूप बोल्डही दिसते. तिचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती हॉटनेसचा तडका लावताना दिसत आहे.
अमृता प्रकाश ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती दररोज कुठली ना कुठली पोस्ट सोशल मीडियावर टाकते. या पोस्ट तिच्या फॅन्सकडून खूप पसंत केल्या जातात. यादरम्यान तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील तिच्या बोल्ड लूकमुळे सारेजण घायाळ झाले आहेत. बॅकलेस ड्रेसमधील तिच्या पोस्टमधील फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमृता प्रकाश हिने विना ब्लाउजची साडी नेसली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. फिल्म इंडस्ट्रीत तिला फार यश मिळाल नसलं तरी ती इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.
तिच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास तिने सुरुवातीच्या काळात खूप चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यामध्ये विवाह, तुम बिन, मैने दिल तुझको दिया, एक विवाह ऐसा भी या चित्रपटांचा समावेश होता. मात्र आता ती चित्रपट क्षेत्रापासून दूर तिच्या वैयक्तिक जीवनात व्यस्त आहे. तसेच चित्रपटात पुनरागमन करण्याबाबतही तिने काही अपडेट दिलेली नाही.