दारू गोदामाची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Published: May 17, 2017 12:19 AM2017-05-17T00:19:32+5:302017-05-17T00:19:32+5:30

राज्य सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारु गोदामाची सुरक्षा ऐरणीवर आहे.

Alcohol warehouse safety alarm | दारू गोदामाची सुरक्षा ऐरणीवर

दारू गोदामाची सुरक्षा ऐरणीवर

Next

उत्पादन शुल्क विभागातील प्रकार : चोरट्यांसाठी रान मोकळे
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारु गोदामाची सुरक्षा ऐरणीवर आहे. मुख्य मार्गालगत असलेल्या या गोदामामधील टीनपत्रे फुटलेले असून दरवाजाही औटघटकेचा आहे. त्यामुळे दारु चोरट्यांना येथून दारु चोरण्यासाठी मोठी संधी प्राप्त होते.
‘कुबेर’ कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भंडारा येथील कार्यालय आवारातच त्यांनी पकडलेला दारुसाठा ठेवण्याचे गोदाम आहे. खूप वर्षापूर्वी बांधलेली ही इमारत आता जीर्णावस्थेत आहे. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर असलेल्या या शासकीय इमारतीला संरक्षण भिंत नाही.
अशा स्थितीत या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईतील जप्त केलेली लाखो रूपये किमतीचा दारुचा साठा या जीर्णावस्थेतील इमारतीत ठेवण्यात येते. या इमारतीवरील छताला ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहेत. या भगदाडातून चढून गोदामामध्ये उतरणे दारु चोरांना सहज शक्य होईल अशी स्थिती इमारतीकडे बघितल्यावर लक्षात येते. त्यात गोदामाला मुख्य रस्त्याच्या दिशेला एक लाकडी दरवाजा लावण्यात आलेला आहे. तोही अगदी तुटक्याफुटक्या अवस्थेत आला असून दरवाजाला लात मारल्यावर तो सहज तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोट्यवधी रुपये शासनाला महसूल रूपात देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची परिस्थिती अत्यंत ‘दयनीय’ अशी झालेली आहे.

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय आवारात दारुच्या रिकाम्या शिशा सापडून आल्याचे ‘पोस्टमार्टम’ लोकमतने केले. या संबंधात मंगळवारला ‘उत्पादन शुल्क विभाग नव्हे दारुचा अड्डा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच या कार्यालयात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी येथील कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावल्याचीही चर्चा ऐकीवात आहे. दारुची विल्हेवाट कार्यालयातच लागत असल्यास हीच परिस्थिती चोरांसाठीही माफक बनली आहे. त्यामुळे या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Alcohol warehouse safety alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.