दूध उत्पादकांचे आंदोलन चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:17+5:30

भंडारा जिल्ह्यात धान उत्पादनासह जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात.

The agitation of milk producers will be irritating | दूध उत्पादकांचे आंदोलन चिघळणार

दूध उत्पादकांचे आंदोलन चिघळणार

Next
ठळक मुद्देकोट्यवधींचे चुकारे अडले : आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक संस्था पडल्या बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे अनेक महिन्यांपासूनच कोट्यवधींचे चुकारे अडविल्याने संस्था व दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुधाचे देयक तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. थकीत देयक मिळण्यासाठी सर्व संस्थांचे पदाधिकारी एकवटल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.
भंडारा जिल्ह्यात धान उत्पादनासह जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात.
जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जिल्हा दूध संघाने अचानकपणे एप्रिल २०१९ पासून दूध संस्था व शेतकऱ्यांचे देयक अडवून ठेवले आहे.
संस्थांचे देयक अडविल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक लहान संस्था बंद पडल्या आहेत. परंतु, त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही. या संस्थांचे १६० दिवस अर्थात १६ आठवड्यांचे देयक तातडीने देण्यात यावे, यासाठी दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शेकडो संस्थाचालकांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध संघाला घेराव घातला होता. परंतु, त्यातूनही काहीच साध्य न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाणार आहे. तरीसुद्धा देयके न मिळाल्यास दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे. आता कधी चुकारे वाटप केले जाते, याकडे गोपालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The agitation of milk producers will be irritating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध