शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बपेराचा पशू दवाखाना वनवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

आंतरराज्यीय सिमेवर असणाऱ्या बपेरा गावात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत श्रेणी-१ चा पशु दवाखाना मंजुर कण्यात आला आहे. गत अनेक वर्षापासून समाजमंदिरात पशु दवाखान्याचे अतिक्रमण आहे. या दवाखान्यात साधी बैठकीची व्यवस्था नाही. याशिवाय प्रशासकीय कामकाज करताना अडचणीचे ठरत आहे. दवाखान्यात लसीकरणाचे औषधी सुरक्षीत ठेवताना कार्यरत कर्मचाºयाची धांदल आहे.

ठळक मुद्देसमाजमंदिरातून औषधोपचार : दवाखान्यात सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बपेरा येथील पशु दवाखान्याचा कारभार गत अनेक वर्षापासून समाजमंदिरातून होत आहे. येथूनच जनावरांना लसीकरण, औषधोपचार करण्यात येत आहे. यामुळे आजही या दवाखान्याचा वनवास संपला नाही.
आंतरराज्यीय सिमेवर असणाऱ्या बपेरा गावात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत श्रेणी-१ चा पशु दवाखाना मंजुर कण्यात आला आहे. गत अनेक वर्षापासून समाजमंदिरात पशु दवाखान्याचे अतिक्रमण आहे. या दवाखान्यात साधी बैठकीची व्यवस्था नाही. याशिवाय प्रशासकीय कामकाज करताना अडचणीचे ठरत आहे. दवाखान्यात लसीकरणाचे औषधी सुरक्षीत ठेवताना कार्यरत कर्मचाºयाची धांदल आहे.
या पशु दवाखान्याला बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील सुकळी नकुल, गोंडीटोला, बपेरा, बिनाखी, वारपिंडकेपार, महालगाव, ब्राम्हणटोला, देवसर्रा, सोंड्या गावे जोडण्यात आली आहेत. या गावात गत पशुगणनेनुसार देशी गाय, संकरीत गाय, म्हैस, शेळ्या, कोबड्या असे सहा हजार ७०५ अशी नोंद करण्यात आली आहे.
जनावरांना लसीकरण, औषधोपचार करण्याची जबाबदारी याच पशु दवाखान्याच्या यंत्रणेवर आहे. याशिवाय शिबिर आणि मेळावे आयोजित करण्यात येत असताना सुविधा नगण्य आहेत. पशु दवाखान्याचे इमारत बांधकाम करण्यात आले नाही. गावात जागेची अडचण आहे. कधी बुडीत तर कधी रेड झोन जागेत इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे वारंवार बांधकामाचा प्रस्ताव नाकारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुर्नवसीत जागेत प्रस्ताव सादर करण्याकरिता पुढाकार घेण्यात आला असता विरोध झाला आहे. यामुळे गावात आता जागा उपलब्ध नाही. इमारत बांधकाम झाले नाही. याच गावाशेजारी देवसर्रा गावाची सिमा आहे. या गावाचे हद्दीत पशुदवाखाना बांधकाम मंजुर करण्याचे प्रयत्न झाले नाही. जनावरांचे जतन आणि संवर्धन संदर्भात यंत्रणा गंभीर नाही. बपेरा बसस्थानक परिसरात जागा उपलब्ध असताना या दिशेने एक पाऊल पुढे ठेवण्यात येत नाही. यामुळे शेतकºयाचे पशुपालन व्यवसायाला वैद्यकीय सहकार्य मिळत नसल्याने जनावराचे संख्येत घट होत आहे.

चुल्हाड येथील गोपालक संकटात
राज्य शासनाचे अखत्यारीत असणाऱ्या चुल्हाडच्या पशु दवाखान्यात विदारक चित्र आहे. या दवाखान्यात पशुचिकित्सक, इमारत, टेबल आणि खुर्च्या नाहीत. या दवाखान्याचा प्रभार देण्यात येत आहे. आठ हजार जनावरांना लसीकरणाचे वांदे आहेत. या दवाखान्यात एक ना धड, भाराभर चिंद्या असे चित्र असताना लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. यामुळे संताप आहे. समस्या निकाली काढण्याची मागणी आहे.

बपेरा आणि चुल्हाड गावातील पशु दवाखान्याचा विषय गंभीर आहे. जनावरांना औषधोपचार करताना अडचणीचे ठरत आहेत. समस्या सोडविण्याकरिता आंदोलन करण्यात येईल.
-किशोर राहांगडाले,
सामाजिक कार्यकर्ता, बिनाखी.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल