शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या आश्वासनानंतर शिक्षकांच्या उपोषणाची सांगता

By admin | Updated: November 19, 2014 22:34 IST

प्राथमिक शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे मासिक वेतन आणि २००६ पासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन

भंडारा : प्राथमिक शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे मासिक वेतन आणि २००६ पासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले. त्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली. काल, मंगळवार रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.या उपोषणमंडपाला आमदार चरण वाघमारे, आ.राजेश काशिवार, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांनी भेटी दिल्या. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खा.नाना पटोले, जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, भरत खंडाईत यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून वेतनाचा निधी दोन दिवसात जिल्हा परिषदेला प्राप्त होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे मासिक वेतन २५ नोव्हेंबर पर्यंत शिक्षकांना प्राप्त होणार आहे. या विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर राज्य शासनानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे खा.पटोले यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणित हित लक्षात घेता आमरण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले. शिक्षकांनी मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापुढेही उपोषण करण्यात येईल, अशी घोषणा करताच खा.पटोले यांनी शिक्षकांना वेतन नियमित न मिळणे ही गंभीर बाब समजून त्या समस्या सोडविण्यासाठी मी जबाबदारी स्वीकारतो असे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, शिलकुमार वैद्य, नरेश कोल्हे, रमेश काटेखाये, केशव अतकरी, शंकर नखाते, योगेश कुटे, तुलशीदास पटले, अशोक ठाकरे, केशव बुरडे, मुलचंद वाघाये, नरेश देशमुख, हिवराज लंजे, टी.डी. दमाहे, विजय चाचेरे, अरुण बघेले यांच्यासह जवळपास ६४ शिक्षक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)