अड्याळ ग्रामपंचायतीचा कारभार प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:35+5:302021-02-05T08:40:35+5:30

माहितीनुसार, एस. एम. मोहोळ या ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे पिंपळगाव आणि अड्याळ ग्रामपंचायतीचा कारभार आहे. ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची नेमकी ...

Adyal Gram Panchayat is run by the Rural Development Officer in charge | अड्याळ ग्रामपंचायतीचा कारभार प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

अड्याळ ग्रामपंचायतीचा कारभार प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

माहितीनुसार, एस. एम. मोहोळ या ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे पिंपळगाव आणि अड्याळ ग्रामपंचायतीचा कारभार आहे. ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची नेमकी कुठे नेमणूक झाली असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अड्याळ असून यात प्रशासकीय कामेही मोठी आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते. मात्र आठवड्यातून तीन दिवसच ग्रामविकास अधिकारी उपस्थित राहत असल्याने अनेक कामांचा खेळखंडोबा होत आहे. गत चार ते पाच महिन्यांपासून ग्रामपंचायत येथे ग्राम विकास अधिकारी मोहोळ हे आठवड्यातून कधी तीन तर कधी दोन दिवस कामकाज पाहायला येतात. येथे पूर्णवेळ म्हणून ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे. कामानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ग्रामस्थांना आल्यापावली परत जावे लागत आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून पूर्णकालीन ग्रामसेवक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवासी यांनी केली आहे

Web Title: Adyal Gram Panchayat is run by the Rural Development Officer in charge