दिल्ली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या वकिलांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:50+5:30

या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संघटनेचे ७० सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदर घटनेबाबत चर्चा करुन सर्वानुमते निषेध व्यक्त करण्यात आला.

Advocates attack Delhi Police | दिल्ली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या वकिलांचा निषेध

दिल्ली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या वकिलांचा निषेध

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात २ नोव्हेंबर रोजी वकीलांनी दिल्लीपोलिसांवर हल्ला करुन अनेकांना जखमी केले. उलट पोलिसांविरुद्धच तक्रार दाखल करुन त्यांना आरोपी बनविण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेचा निषेध करत वकिलांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन शाखा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संघटनेचे ७० सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदर घटनेबाबत चर्चा करुन सर्वानुमते निषेध व्यक्त करण्यात आला.
या घटनेतील दोषी वकीलांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्यांचा वकीली परवाना रद्द करण्यात यावा व या घटनेची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले.
शिष्टमंडळात संघटनेचे बी.जे. यादव, गजानन भोवते, पुंडलिक निखाडे, माणिक घोडीचोर, नारायण माकडे, धनराज कोचे, मुरलीधर ठवरे, अमरसिंह राठोड, आनंदराव कोहडे, अरविंद कानेकर, अशोक मेश्राम, भाऊराव कोचे व पोलिस बॉईज असोसिएशनचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Advocates attack Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.