शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे फुकट जाहिरातबाजांवर होणार कारवाई

By admin | Updated: February 11, 2015 00:35 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर अनधिकृतपणे स्टिकर, पोस्टरर्स व बसस्थानक परिसरात होर्डिंग्स लावून जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध...

लोकमत विशेषदेवानंद नंदेश्वर भंडारामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर अनधिकृतपणे स्टिकर, पोस्टरर्स व बसस्थानक परिसरात होर्डिंग्स लावून जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध आता पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या बसेस व स्थानकावर संधीसाधूनी व्यवसायाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी स्टिकर व पोस्टर लावतात. त्यासाठी रीतसर परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे बसेस व स्थानकाचे विद्रुपीकरण होत असून महसूलसुद्धा बुडतो. अशा जाहिरातबाजांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत बसस्थानक परिसरात होर्डिंग्स लावू नये, अशा सूचना भंडारा बस स्थानकावर उद्घोषणेद्वारे केले जात आहेत. मात्र फुकटच्या जाहिरातबाजांवर आवर घालणे कठिण होत आहे. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा २००५ नुसार रूग्णालये, रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिराती लावू नये किंवा जाहिराती लावायच्याच असतील तर संबंधित करारबद्ध कंपन्यांकडून रितसर परवानगी घेऊन लावावे, असे नियम आहेत. मात्र बसस्थानक परिसरात संधी साधून होर्डिंग्स लावण्यात येत असल्याचे प्रकार आढळले आहेत. दुसऱ्या दिवशी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सदर जाहिरातीवरील मोबाईल क्रमांक व इतर माहिती संकलित केली जात आहे. अशा जाहिरातबाजांना एकदा समज दिली जात असून पुन्हा तसाच प्रकार आढळला तर पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. भंडारा आगाराच्या बसेस अकोला व अमरावती अशा दूर ठिकाणाहून परतल्या की बसच्या आत किंवा बाहेर जाहिरातीचे स्टिकर किंवा पोस्टर लावलेले आढळते.अंनिस करणार पोलिसांत तक्रारएसटी बसमध्ये लावलेल्या जाहिरातींमध्ये वशीकरण, शिल्पकार, मूर्तिकार व भोंदूबाबांच्या जाहिरातींचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे अशा जाहिरातींची माहिती जमा करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहमतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येईल. अशा जाहिरातबाजांनी फुकटच्या जाहिराती करण्यापासून किंवा एसटीचे विद्रुपीकरण करण्यापासून स्वत:ला आवरले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अंनिसचे विष्णू लोणारे यांनी दिली.जाहिरातींसाठी दोन कंपन्यांसह करारनामाएसटी बसवर किंवा बसच्या आत जाहिरात लावण्यासाठी पृथ्वी असोसिएट्स मुंबई या कंपनीसह करार करण्यात आला आहे. बसस्थानक परिसरात होर्डिंग्सद्वारे जाहिरात करण्यासाठी काही कंपनीसह करार करण्यात आला असून या कंपनीचे कापोर्रेट कार्यालय मुंबई येथे आहे. ज्यांना बसद्वारे किंवा बस स्थानक परिसरात जाहिरात करायची असेल त्यांना रीतसर सदर कंपन्यासह बोलून संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याचे शुल्क भरल्यावरच अधिकृतपणे जाहिरात केली जावू शकते. त्याद्वारे लिलावातून कोटी रूपयांचा महसूल गोळा होतो.