शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या षडयंत्राने मुलांवर कारवाई

By admin | Updated: July 22, 2014 23:53 IST

हिंदुत्ववादी संघटना असलेली बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख पदाधिकारी असलेल्या प्रवीण उदापुरे व पंकज उदापुरे यांच्यावर भंडारा पोलिसांनी षडयंत्र रचून गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे खोटे असून माझ्या

भंडारा : हिंदुत्ववादी संघटना असलेली बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख पदाधिकारी असलेल्या प्रवीण उदापुरे व पंकज उदापुरे यांच्यावर भंडारा पोलिसांनी षडयंत्र रचून गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे खोटे असून माझ्या मुलांना पोलिसांनी नाहक फसविल्याचा आरोप मनोहर उदापुरे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.यावेळी त्यांनी पुढे सांगताना, बजरंग दलाचे कार्य करीत असताना माझा मुलगा प्रविण हा सामाजिक व धार्मिक भावनेतून काम करीत आहे. दरम्यान त्याने अनेकदा धार्मिक स्वरूपाच्या बाबींसाठी आंदोलने केले. यामुळे त्याच्यावर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. दरम्यान घरी पाहुणे बसले असताना भंडारा पोलीस ठाण्याचा एक पोलीस कर्मचारी घरी येवून त्याने प्रविण उदापुरेला ठाण्यात बोलविल्याचे सांगितले.याबाबत मी स्वत: पोलीस स्टेशनला मुलावरील आरोपांच्या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेण्याकरीता गेलो असता पोलिसांनी माझ्याशी असभ्यपणाची वर्तणूक दिली. व प्रविणवर तडीपारीची कारवाई करावयाची असल्याचे सांगत त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणले. यानंतर कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता पोलिसांनी मोठ्या ताफ्यासह माझ्या घरी येऊन लहान मुलगा पंकजला भंडारा पोलीस ठाण्यात नेले. यानंतर त्याला लॉकअपमध्ये आरोपीसारखी वागणूक दिली. प्रविणला पकडण्याकरीता पोलिसांनी अनेक टीम बनविली. वेळोवेळी घरी येऊन आमचे मानसिक शोषण केले. माझे दोन्ही मुले निर्दोष असून पोलिसांनी त्यांना षडयंत्रात फसवून त्यांच्यावर कारवाई केली असून यात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मनोहर उदापुरे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)