भंडाऱ्यात डॉक्टरच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्येसुद्धा विकले होते एक बाळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:19 IST2026-02-14T13:17:36+5:302026-02-14T13:19:55+5:30

Bhandara : बाळाची विक्री करणाऱ्या गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी याच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्ये देखील एका बाळाची अशाच पद्धतीने विक्री केली होती, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे.

A doctor's gang in Bhandara had previously sold a baby in December! | भंडाऱ्यात डॉक्टरच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्येसुद्धा विकले होते एक बाळ !

A doctor's gang in Bhandara had previously sold a baby in December!

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
बाळाची विक्री करणाऱ्या गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी याच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्ये देखील एका बाळाची अशाच पद्धतीने विक्री केली होती, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे. ते बाळ नेमके कुणाचे, बाळ खरेदी करणारे कोण आणि यात पुन्हा सहभागी कोण या प्रश्नांची उत्तरे शोधत पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे.

अटकेत असलेल्या लालेश्वरी नंदकिशोर सादेपाच या महिलेकडून सध्या जाबजबाब सुरू आहेत. अन्य चार आरोपी फरारच असल्याने सध्यातरी चौकशीचे केंद्र या महिलेभोवतीच आहे. गरीब आणि अधिक अपत्ये असणाऱ्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या टोळीने काही एजंट ठेवले होते का, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धागेदोरे उघड होत आहेत. गुन्हा दाखल झालेले आरोपी जाळ्यात आल्यावर अनेक बाबींवरील पडदा दूर होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी हे प्रकरण चौकशीसाठी साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम विसापुरे यांच्याकडे सोपविले आहे.

वाजपेयीचा दवाखाना आधीपासूनच चर्चेत

गोंदीयातील रामनगर पोलिसांच्या हद्दीत असलेले नितेश वाजपेयी याचे न्यू बालाजी हॉस्पिटल अँड सोनोग्राफी सेंटर आधीपासूनच चर्चेत आहे. एका राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत या डॉक्टरने जवळीक साधली होती, अशीही माहिती आहे. गोंदियातील एका जिल्हा शल्यचिकित्सकाविरोधात तक्रारीचे सत्र या डॉक्टरने काही काळापूर्वी चालविले होते, तेव्हापासूनच हे हॉस्पिटल चर्चेत आहे.

डॉक्टरच्या वकिलाला न्यायालयाने फटकारले

  • दरम्यान, फरार असलेला डॉक्टर डॉ. नितेश वाजपेयी याच्या वकिलाने भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाकडे आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडेही जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर १७फेब्रुवारीला सुनावणी होणार होती.
  • मात्र, त्यापूर्वीच नागपूर खंडपीठाला ही बाब लक्षात आल्यावर, कोणत्याही एका न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने फटकारले.
  • त्यामुळे नागपुरातील अर्ज मागे घेऊन आता भंडाऱ्यातील न्यायालयाकडे कायम ठेवला आहे.


 

Web Title : भंडारा: डॉक्टर गिरोह ने पहले भी दिसंबर में बेचा था बच्चा!

Web Summary : भंडारा में बच्चा बेचने वाले डॉक्टर गिरोह ने दिसंबर में भी एक बच्चा बेचा था। पुलिस संभावित एजेंटों और खरीदारों सहित नेटवर्क की जांच कर रही है। एक महिला हिरासत में है, जबकि अन्य फरार हैं। डॉक्टर का अस्पताल पहले से ही विवादास्पद था।

Web Title : Bhandara doctor gang sold a baby previously in December too!

Web Summary : A doctor's gang involved in baby selling in Bhandara previously sold a baby in December. Police are investigating the network, including potential agents and buyers. One woman is in custody, while others are at large. The doctor's hospital was already controversial.