शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

६७ हजार नागरिकांनी केले ‘आरोग्य सेतू’ डाऊनलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अ‍ॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही ही माहिती कळते. या अ‍ॅपमध्ये मोबाईल नंबर, ब्लुट्यूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्यावेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्यावेळी सदर अ‍ॅप युजर्सना अलर्ट करतो.

ठळक मुद्देकोरोना : अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संदर्भात अद्ययावत व वस्तूनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी शासनाने आरोग्य सेतू अ‍ॅप विकसित केले असून वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात आजपर्यंत ६७ हजार ६२० नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अ‍ॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही ही माहिती कळते. या अ‍ॅपमध्ये मोबाईल नंबर, ब्लुट्यूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्यावेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्यावेळी सदर अ‍ॅप युजर्सना अलर्ट करतो. सदर अ‍ॅप अ‍ॅन्ड्राईड व आॅयकॉन या दोन्ही व्हर्जनवर आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोनाची लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सेंटर नंबर दिले आहे. केंद्र सरकारने सदर आरोग्य सेतू अ‍ॅप लाँज केल्यानंतर आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात ६७ हजार ६२० नागरिकांनी सदर अ‍ॅपला पसंती दिली आहे. सदर अ‍ॅप सर्वांनी आपल्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवर आरोग्य सेतू या नावाचे प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून आपल्याबद्दल असलेले संपूर्ण माहिती अचूक भरण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

५०४ पोलिसांची आरोग्य तपासणी
कोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात ५०४ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील १३५, पवनी ६४, तुमसर ८०, मोहाडी १०१, साकोली ७५, लाखांदूर २० व लाखनी तालुक्यातील २९ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :Healthआरोग्य