शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थ्यांना ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य

By admin | Updated: September 11, 2016 00:33 IST

विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या ६ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रूपये याप्रमाणे ४.५० लाख रूपयांचे ...

राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना भंडारा : विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या ६ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रूपये याप्रमाणे ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनीराजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेद्वारे मंजूर केले.यामध्ये जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा विरली ता. लाखांदूर येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी चेतन तरोणे याचा धानाच्या पोत्याखाली दबून मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोवा ता.भंडारा येथील तिसऱ्या वर्गात शिकणारा नकुल फलबांधे याचा विद्युत करंट लागल्याने मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडी ता. लाखनी येथील चौथ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आकाश पटले याचा बुडून मृत्यू झाला होता.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही (मोखे) ता. साकोली येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी रूद्रप्रताप उंदिरवाडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. एस.एस. इंग्लीश स्कूल अडयाळ ता. पवनी येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी चाणक्ष पोपट याचा वाहन अपघाताने मृत्यू झाला होता तर नवजीवन विद्यालय निष्टी ता. पवनी येथील दहाव्या वर्गातील सारीका अलोणे हिचा जळाल्याने मृत्यू झाला होता. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहा दाव्यांकरीता राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दावे दाखल केले होते. या प्रस्तावांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रूपये याप्रमाणे ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले. (जिल्हा प्रतिनिधी)