शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामज्योती योजनेचा २५ कोटींचा आराखडा मंजूर

By admin | Updated: February 21, 2016 00:24 IST

केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे.

जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत निर्णय : दीनदयाल उपाध्याय योजनेतून ग्रामीण विद्युतीकरणावर भर भंडारा : केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी  दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे.  या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांना नियमित वीज पुरवठा, अकृषक ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, वितरण बळकटीकरण व वृद्धीकरण, तांत्रिक व व्यावसायिक वीज हानी कमी करणे,  या बाबींसाठी २५.५ कोटी रूपयांच्या पायाभूत विकास आराखड्यास जिल्हा विद्युत समितीने मंजुरी दिली आहे.खा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ.अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी उपस्थित होते. या योजनेंतर्गत गावठाण फीडर विलगीकरणासाठी चार वाहिन्या प्रास्तावित असून त्यासाठी ५.२६ कोटी रूपये,  वितरण व्यवस्थेसाठी २४९ किलोमीटरच्या उच्चदाब वाहिन्या, ६१.४८ किलोमीटरच्या लघुदाब वाहिन्या, आणि १०० के.व्ही.ए.चे  ६५ नवीन रोहित्रांसाठी  १७.४८ कोटी रूपयांची तरतूद, दारिद्रय रेषेखालील ३,७६५ कुटुंबाना वीज जोडणीसाठी २.४ कोटी रूपये,  सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी २७ लाख रूपयांची  तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी, सर्वांना वीज, आणि अखंड व योग्य दाबाने वीज पुरवठा अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवित आहे. त्यामुळे या आराखड्यातील कामे तात्काळ सुरू करावे, असे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. ज्या गावांमधून  किंवा  शेतामधून उच्च दाब वीज वाहिन्या गेल्या असतील त्या बदलण्यासाठी  प्रस्ताव तयार करा, अशी सुचना खासदार नाना पटोले यांनी यावेळी केली. डिसेंबर २०१५ पर्यंतचे कृषी पंपासाठी पेंडिंग प्रकरणे जून २०१६ पर्यंत पूर्ण  होतील. तसेच सोलर पंपासाठी १९५ लक्षांक असून १६ अर्ज आतापर्यंत समितीने मंजूर केले आहेत,  अशी माहिती अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी बैठकीत दिली. ग्राहकांच्या  तक्रारीसाठी तीन महिन्यातून एकदा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक घ्यावी, अशी सूचना आमदार अवसरे यांनी केली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीज जोडणीला प्राधान्य द्यावे आणि गोसेखुर्द प्रकल्पातील पुर्नवसित गावांमध्ये वीज जोडणीसाठी शिबिर घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. (नगर प्रतिनिधी)