शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत 193 नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी बंडखोरी टाळण्यासाठी कुणीही आपले उमेदवार घोषीत करीत नाहीत. सोमवार हा नामांकनाचा अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नामांकन भरण्यासाठी शनिवारी सर्वच ठिकाणी एकच गर्दी झाली होती. जिल्हा परिषदेसाठी ५७ तर पंचायत समितीसाठी ८४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९३ नामांकन दाखल झाले असून त्यात जिल्हा परिषदेचे ८२ तर पंचायत समितीसाठी १११ नामांकनाचा समावेश आहे.अद्यापही कोणत्याही पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र आता अवघे दोन दिवस उरल्याने शनिवारी सर्वच ठिकाणी नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. शनिवारी भंडारा तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ३२ तर पंचायत समिती गणासाठी ४७, लाखांदूर तालुक्यात गटासाठी पाच तर गणासाठी आठ, तुमसर गटासाठी चार तर गणासाठी सहा, साकोली गटासाठी पाच तर गणासाठी सहा, लाखनी गटासाठी सहा तर गणासाठी चार, पवनी गटासाठी एक तर गणासाठी दोन तर मोहाडीत गटासाठी चार आणि गणासाठी नऊ नामांकन दाखल झाले. आतापर्यंत जिल्ह्यात लाखांदूरमध्ये गटासाठी आठ आणि गणासाठी आठ, भंडाऱ्यात गटासाठी ४३ तर गणासाठी ५८, तुमसरमध्ये गटासाठी १३ तर गणासाठी १८, साकोली गटासाठी पाच तर गणासाठी आठ, लाखनीत गटासाठी सहा तर गणासाठी चार, पवनीत गटासाठी एक तर गणासाठी दोन आणि मोहाडीत आतापर्यंत गटासाठी सहा व गणासाठी १३ नामांकन दाखल झाले आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी बंडखोरी टाळण्यासाठी कुणीही आपले उमेदवार घोषीत करीत नाहीत. सोमवार हा नामांकनाचा अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.जिल्ह्याचे राजकीय वातावरण आता तापायला लागले असून उमेदवारांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यासह अपक्ष रिंगणात राहणार आहेत.

नामांकनासाठी सोमवार अखेरचा दिवस- नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस असून सोमवारी सर्वच इच्छुक नामांकन दाखल करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नामांकनासाठी गर्दी होणार आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवारही त्याच दिवशी नामांकन दाखल करतील. काही पक्षाच्या उमेदवारांनी यापूर्वीच नामांकन दाखल केले असून पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म जोडणार आहेत. आता सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.

नोडल अधिकारी नियुक्त- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यात भंडारा एस.एस. मुरवतकर, पवनी एम.जी. डहारे, लाखनी डी.आर. मडावी, साकोली डाॅ.नीलेश वानखेडे, लाखांदूर बंडू पातोडे, तुमसर पाटील तर मोहाडी येथे पल्लवी वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद