शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

१२६ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ हजार ४२१ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५९९० व्यक्तींपैकी ४११२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ठळक मुद्देरविवारी १०६ जणांची सुटी : जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ९९० व्यक्ती कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात ५९९० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान रविवारी कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ हजार ४२१ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५९९० व्यक्तींपैकी ४११२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ८८३ जणांचा अहवाल अजूनही अप्राप्त आहे.
तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. नागरिकही आता कोरोनाबाबत जागृक झाले असून संसर्ग टाळण्यासाठी स्वत:हून विविध उपाययोजना करताना दिसत आहे. जिल्ह्यातील एक लाख २० हजार ०६२ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला असून त्यामाध्यमातून कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती मिळत आहेत.
तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेंतर्गत गावागावात तपासणी मोहीम राबविली जात आहे.

आयसोलेशन वॉर्डात ८९ रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात सध्यास्थितीत ८९ रुग्ण कोविड अंतर्गत उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत २२३७ व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. अतितिव्र श्वासदाह असलेल्या रुग्णांवर नजर ठेवली जात आहे. तसेच नागरिकांनी तपासणीसाठी समोर यावे, असे आवाहन केले आहे.

सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात
जिल्ह्यात रविवारी १२६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुक्यातील ५४, साकोली १७, लाखांदूर १३, मोहाडी ८, पवनी २३, लाखनी ११ रुग्णांचा समावेश असून तुमसर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. भंडारा तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३०८५ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहे. तसेच साकोली तालुक्यात एकुण रुग्ण संख्या ४५९, लाखांदूर २६७, तुमसर ५२२, मोहाडी ५५२, पवनी ५४८ तर लाखनी तालुक्यात ५५७ रुग्ण आहेत.

कोविडमुळे तरुणाचा मृत्यू
जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एका ३२ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. सदर तरुण हा तुमसर तालुक्यातील रहिवासी होता. तसेच भंडारा तालुक्यातील ६५ वर्षीय वृध्द कोरोनाने मृत पावले. तर साकोली तालुक्यातील ६६ वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या