शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कारले पिकाच्या सुरक्षिततेसाठी १० फूट उंच हिरव्या जाळीची भिंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST

पालांदूर : गरज ही शोधाची जननी आहे. त्याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात येत आहे. शेतीतील अनुभवाच्या शिदोरीतून ...

पालांदूर : गरज ही शोधाची जननी आहे. त्याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात येत आहे. शेतीतील अनुभवाच्या शिदोरीतून नवनवीन प्रयोग शेतकरी करतात. आता कारले पिकावर आलेल्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दहा फूट उंचची हिरव्या जाळीची भिंत शेताच्या सभाेवार तयार केली. पांढरी माशी केवळ पाच फूट उंच उडत असल्याने जाळी मुळे माशी शेतात शिरत नाही. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरत आहे.

धान पट्ट्यात आता मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेतले जात आहे. अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. मात्र कीड रोग नियंत्रण करताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. त्यातच पांढऱ्या माशीमुळे भाजीपाला पिकाचे मोठे होते. कीटकनाशक वापरून शेतकरी आता दमले आहेत. त्यातूनच अनुभवातून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केला आहे. कारले पिकाच्या संरक्षणासाठी दहा फूट उंचीची हिरवी जाळी उभारून पिकाला संरक्षण देण्यात येत आहे. सध्या पीक सुरक्षित असून पुढचा अभ्यास घेऊन इतर शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येईल, असे पालांदूरचे शेतकरी टिकाराम भुसारी सांगतात. पांढरी माशी पाच फुटांपर्यंतच उडते. त्यामुळे पिकाच्या उंचीच्या नियोजनानुसार दहा फूट उंचीची तटबंदी तयार करून उपद्रवी माशीला बागेत प्रवासच बंद करण्यात आला आहे. त्यात आणखी पिवळ्या रंगाचे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. यामुळे प्राथमिक टप्प्यातील संपूर्ण कृत्रिम नियोजनाने पीक सुरक्षित केलेले आहे.