तुमच्यासाठी कोणते क्षेत्र योग्य आहे, याचे रहस्य सांगते तुमची जन्मतारीख!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 09:00 AM2021-02-26T09:00:00+5:302021-02-26T09:00:02+5:30

अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेवरून आपल्याला करिअरची दिशा मिळू शकते. चला तर ताडून पाहूया, आपली जन्मतारीख, आवड आणि करिअर!

Your date of birth reveals the secret of which career is right for you! | तुमच्यासाठी कोणते क्षेत्र योग्य आहे, याचे रहस्य सांगते तुमची जन्मतारीख!

तुमच्यासाठी कोणते क्षेत्र योग्य आहे, याचे रहस्य सांगते तुमची जन्मतारीख!

googlenewsNext

आपण अनेक डॉक्टर, इंजिनिअर, कलाकार पाहिले आहेत, ज्यांचे शिक्षण एक आणि करिअर दुसरेच असते. कारण, अनेकांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडता न आल्यामुळे जगराहाटी प्रमाणे भूषण ठरतील असे क्षेत्र नाइलजाईने निवडावे लागते. परंतु, त्यात शिक्षण घेऊनही गती मिळतेच असे नाही. म्हणून आपली आवड आणि करिअर यांचा योग्य समन्वय साधता आला, तर खूप चांगले आणि समाधानी आयुष्य जगता येते. यासाठी अंकशास्त्राची मदत घेता येईल. अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेवरून आपल्याला करिअरची दिशा मिळू शकते. चला तर ताडून पाहूया, आपली जन्मतारीख, आवड आणि करिअर... 

जन्मतारीख : १, १०, १९, २८ 
आपला सूर्य आणि मंगळाशी असलेला संबंध मानला जातो. प्रशासन, औषध, तंत्रज्ञान क्षेत्र आपल्यासाठी चांगले आहे. लाकूड व औषधाचा व्यवसाय देखील आपल्यासाठी अनुकूल आहे. रोजगारात अडचण येत असेल तर तांब्याची अंगठी वापरा. तसेच रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. 

जन्मतारीख : २, ११, २०, २९
आपण चंद्र आणि शुक्र दोघांशी संबंधित आहात. कला, अभिनय, संगीत, सौंदर्य आणि जलविज्ञान ही क्षेत्रे उत्कृष्ट आहेत. रुग्णालये, रेस्टॉरंट्स आणि सौंदर्य व्यवसायातदेखील तुम्हाला गती मिळू शकेल. रोजगारामध्ये अडचण येत असेल तर चांदीची साखळी किंवा अंगठी घाला. भगवान शंकराची उपासना करा. 

जन्मतारीख : ३, १२, २१, ३०
आपला संबंध बुध व बृहस्पतिशी आहे. शिक्षण, सल्लागार, वकिली व बौद्धिक कामाशी संबंधित कोणतेही क्षेत्र तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. आपल्याला स्टेशनरी दुकान, शिक्षण क्षेत्र आणि धार्मिक कार्यात खूप रस असेल आणि त्यात यश देखील मिळेल. रोजगारामध्ये अडचण येत असेल तर सोन्याची साखळी घाला. विष्णू सहस्त्रनाम वाचा.

जन्मतारीख : ४, १३, २२, ३१
तुमचा संबंध राहु आणि चंद्राशी आहे. तांत्रिक, औषध, ज्योतिष, तंत्र-मंत्र इत्यादी क्षेत्र आपल्यासाठी चांगले ठरेल. आपणास इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आणि समुपदेशन या क्षेत्रातही चांगली संधी मिळेल. रोजगारात अडचण असेल तर चांदीचा छल्ला घाला किंवा जवळ ठेवा. भगवान शंकराची उपासना करा. 

जन्मतारीख : ५,१४, २३
आपला संबंध बुध व सूर्याशी आहे. पैसा, कायदा, प्रशासन आणि कॉर्पोरेट क्षेत्रे आपल्यासाठी चांगली असतील. आपल्याला लेखन आणि संगीत क्षेत्रातही फायदा होऊ शकेल. रोजगारामध्ये अडचण येत असेल तर कास्य वापरा. श्रीकृष्णाची उपासना केल्यास करिअरला गती मिळेल. 

जन्मतारीख : ६, १५, २४
आपण शुक्र व बुधाशी संबंधित आहात. अभिनय, चित्रपट, माध्यम आणि वैद्यकीय क्षेत्र आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरेल. तुम्हाला शिक्षण क्षेत्रातही मोठा फायदा होऊ शकेल. रोजगारामध्ये अडचण असल्यास चांदीची अंगठी घाला. शिव पार्वतीची उपासना करा. 

जन्मतारीख : ७, १६, २५
आपण केतू आणि शुक्राशी संबंधित आहात. धर्म, शिक्षण, कला, संशोधन आणि तंत्रज्ञान ही क्षेत्रे आपल्यासाठी चांगली असतील.  औषधांच्या क्षेत्रातही आपल्याला यश मिळू शकते. रोजगाराच्या क्षेत्रात जर अडचण येत असेल तर सोनं घाला. गणपतीची उपासना केल्यास खूप फायदा होईल. 

जन्मतारीख : ८,१७, २६ 
आपण शनि आणि मंगळाशी संबंधित आहात. प्रशासन, राजकारण, कायदा आणि अभियांत्रिकीचे क्षेत्र आपल्यासाठी चांगले असेल. अध्यात्म, ज्योतिष आणि तंत्र मंत्र क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल. रोजगारामध्ये काही समस्या असल्यास पितळी अंगठी घाला. शनि आणि हनुमानाची नियमित पूजा करावी. 

जन्मतारीख : ९, १८, २७ 
आपल्यावर मंगळ व गुरूचा प्रभाव आहे. सैन्य, कारखाना, जमीन आणि बांधकाम ही क्षेत्रे आपल्यासाठी चांगले असतील. आपण शिक्षण आणि लेखनात देखील यशस्वी होऊ शकता. रोजगारामध्ये अडचण येत असेल तर तांब्याची अंगठी घाला. हनुमंताची नियमितपणे पूजा करा.

Web Title: Your date of birth reveals the secret of which career is right for you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.