शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

International Yoga Day 2020 : कोरोनाशी लढण्यासाठी योगाभ्यास आणि आयुर्वेद हीच बलशाली शस्रे : बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:33 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आणि झाल्यास त्याच्यापासून बचावासाठी उत्तम प्रतिकारशक्ती असावी लागते.

नाशिक : ‘जगभरातली उच्चतम प्रतीची मानवी प्रज्ञा ‘शस्रे’ आणि ‘औषधे’ या दोन गोष्टींची अत्याधुनिक रूपे शोधून काढण्यात गुंतलेली असावी, हे अतिशय दुर्दैवी आहे. एक गोली बाहरसे मारती है, दुसरी गोली अंदरसे खोकला बनाती है.. हे कधीतरी थांबवावे आणि जगाला सुख-शांतीच्या, निरामय आरोग्याच्या सम्यक मार्गावर घेऊन जावे, असा विचार जगभरातली सुज्ञ माणसे आतातरी करणार की नाही?’ - असा सवाल योगगुरु बाबा रामदेव यांनी विचारला आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित ‘लोकमत : योगायुग’ या विशेष वेब-संवादात ते बोलत होते. रोझरी फाउण्डेशन पुणे हे या वेब-संवादाचे विशेष प्रायोजक होते.कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आणि झाल्यास त्याच्यापासून बचावासाठी उत्तम प्रतिकारशक्ती असावी लागते. नियमित प्राणायाम, भस्रीका, कपालभाती, अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार यासारखा योगाभ्यास आणि हळद, शिलाजित, केशर, अश्वगंधा, च्यवनप्राश आदी आयुर्वेदिक द्रव्यांचे सेवन हा कोरोनाशी लढण्याचा उत्तम मार्ग आहे, असे बाबा रामदेव यांनी ठासून सांगितले. कमजोर माणसावर कोरोनाच काय, सगळेच हल्ला चढवतात. त्यामुळे नियमित योगाभ्यासाने आपले शरीर ‘तगडे’ बनवणे, मन स्वस्थ राखणे आणि तन-मन-आचरण-व्यवहार यावर आपला ताबा असणे महत्त्वाचे, अशी त्रिसूत्री बाबा रामदेव यांनी या वेब-संवादात मांडली.मुलांच्या डोळ्यासमोर सतत असणाऱ्या वेगवेगळ्या ‘स्क्रीन्स’मुळे त्यांची दृष्टीच नव्हे तर त्यांचे आत्मबळही अधू होऊ लागले आहे. आपली मुले ऐन तारुण्यात म्हातारी दिसू लागली आहेत. त्यांना उत्तम शरीरसंपदा कमावण्यासाठी योगाभ्यासाकडे वळवा, असे आवाहन बाबा रामदेव यांनी केले. सूर्यनमस्कार, शीर्षासन, ताडासन, सर्वांगासन, हलासन, चक्रासन आणि पश्चिमोत्तानासन ही किमान आसने मुलांनी शिकून घेतली-केली पाहिजेत, यावर त्यांचा भर होता.लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा आणि पुणे येथील रोझरी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विनय आºहाना यांनी रामदेव बाबांशी संवाद साधला. विज्ञान आणि अध्यात्म यांचा उचित संयोग असलेले विश्व नागरिक घडवण्याच्या रोझरी फाऊंडेशनच्या कार्यात बाबा रामदेव यांच्या उपदेशाचे मोठे मार्गदर्शन होईल, अशी कृतज्ञ भावना आºहाना यांनी याप्रसंगी व्यक्त केली.>.. मोदीजी थोडे झिझक जाते है!’‘तुम्ही योगाचा पुरस्कार करता, पंतप्रधान मोदीही योगाचे पुरस्कर्ते आहेत; मग भारतीय शिक्षणक्रमात योगाभ्यास अनिवार्य करण्याचे घोडे इतके दिवस अडून का बसले आहे?’- असा थेट प्रश्न लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारला, तेव्हा मिश्कील हास्य करत बाबा रामदेव म्हणाले, ‘मोदीजी तो स्वयं योग करते है, लेकिन निर्णयलेनेका समय आया, तो थोडेझिझक जाते है!’>चीनला मात देण्यात काय कठीण?‘भारताने ठरवले, तर चीनवरचे अवलंबित्व कमी करून आत्मनिर्भर होणे आपल्याला अजिबात कठीण नाही. फक्त त्यासाठी किमान पाच वर्षे कठोर मेहनत मात्र करावी लागेल, असा विश्वास या वेब-संवादात बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. मात्र या प्रवासात ज्या भारतीय कंपन्या धोका पत्करायला तयार होतील, त्यांच्यामागे सरकारला आपले पाठबळ उभे करावे लागेल, आवश्यक करसवलती द्याव्या लागतील, अशी सूचक पुस्तीही त्यांनी जोडली.> विरोधक प्रत्येकच गोष्टीत आडकाठ्या आणतात, त्यामुळे अशा गोष्टींना विलंब होतो, याबाबत नाराजी व्यक्त करून बाबा रामदेव म्हणाले, ‘लेकिन आप देखना, हम तो योग अनिवार्य करकेही मानेंगे..’शालेय वयापासूनच मुलाना योगाभ्यास शिकवला पाहिजे. भविश्यातली आपली पिढी शरीर आणि मनाने सशक्त होण्यासाठी तातडीने हे पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.>भारतातली आपण माणसे राहतो या भूमीत, पोसले जातो इथल्या अन्नावर; पण गाणी मात्र सतत ‘पश्चिमे’ची गातो. म्हणूनच कोरोनाच्या संसर्गामुळे होणाºया कोविड आजारावर उपचारासाठी आपल्या मातीतला आयुर्वेद आणि योगाभ्यासाची उपाययोजना करण्याचा आपल्याला विसर पडतो’, अशा शब्दांत रामदेव बाबा यांनी प्राप्त आरोग्यव्यवस्थेबाबत या वेबीनारमध्ये बोलतांना नाराजी व्यक्त केली.>पाहा आणि ऐका रामदेव बाबांना...सदर वेब-संवाद ‘लोकमत’चे फेसबुक पेज आणि यू-ट्यूब चॅनलवर शनिवारी सकाळी लाइव्ह प्रसारित झाला.त्याचे ध्वनिचित्रमुद्रण या दोन्ही ठिकाणी पाहता येईल.>https://bit.ly/RamdevBabaFacebook>https://bit.ly/RamdevBabaYoutube

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा