कोणत्या देवाकडे काय मागावे? विष्णूंनी स्वतः सांगितलेले 'ते' रहस्य; जे तुमचे आयुष्य बदलू शकते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:12 IST2026-03-23T11:11:33+5:302026-03-23T11:12:24+5:30

मंदिरात गेल्यावर आपली भौतिक सुखं न मागता कोणते मागणे मागावे याबाबत ब्रह्मवैवर्त पुराणात माहिती दिली आहे, ज्यामुळे आपला भाग्योदय होतो. 

Which God should you ask for what? 'That' secret told by Vishnu himself; which can change your life! | कोणत्या देवाकडे काय मागावे? विष्णूंनी स्वतः सांगितलेले 'ते' रहस्य; जे तुमचे आयुष्य बदलू शकते!

कोणत्या देवाकडे काय मागावे? विष्णूंनी स्वतः सांगितलेले 'ते' रहस्य; जे तुमचे आयुष्य बदलू शकते!

मंदिरात गेल्यावर आपण सहसा हात जोडतो आणि देवाला म्हणतो, "देवा, माझं प्रमोशन होऊ दे," "मला चांगली गाडी मिळू दे," किंवा "घरात भरभराट होऊ दे." पण ब्रह्मवैवर्त पुराणात भगवान विष्णूंनी स्पष्टपणे सांगितले आहे की, देवदर्शनाचा खरा हेतू केवळ भौतिक सुखं मिळवणे हा नसून, आपल्या आत्मिक प्रगतीसाठी विशिष्ट देवांकडे विशिष्ट गोष्टी मागणे हा आहे.

चैत्र नवरात्र आणि लक्ष्मी पंचमी: आर्थिक स्थैर्य आणि सुख-समृद्धीसाठी असा करा देवीचा जागर!

अनेकांना वाटते की देवाला जे मागू ते मिळते, पण आपण काय मागतो यावर आपली पात्रता ठरते. आपण केवळ 'नाशवंत' गोष्टी मागतो, ज्या आज आहेत आणि उद्या नाहीत. पण पुराणांनुसार, कोणत्या देवाकडून काय प्राप्त करून घ्यावे, याचे एक शास्त्र आहे. या संदर्भात ब्रह्मवैवर्त पुराणात एक श्लोक दिला आहे त्याचा अर्थ जाणून घेऊ. 

गणेशं विघ्ननाशाय निष्पापाय दिवाकरम् ।
वह्निं स्वशुद्धये विष्णुं मुक्तये पूजयेन्नरः ॥94॥ 
शिवं ज्ञानाय तदिनां शिवां बुद्धिविवृद्धये ।
सम्पूज्यैतल्लभेत्प्राज्ञो विपरीतमतोऽन्यथा ॥95॥

श्लोकाचा अर्थ : 

१. गणेशं विघ्ननाशाय (गणपती): विघ्न दूर करण्यासाठी गणेशाची पूजा करावी. आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत, हीच गणेशाकडे पहिली मागणी असावी.
२. निष्पापाया दिवाकरम् (सूर्य): पापांच्या विनाशासाठी आणि अंतर्बाह्य शुद्धीसाठी सूर्याची (दिवाकर) उपासना करावी.
३. वह्निं स्वशुद्धये (अग्नी): स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी अग्नीची पूजा करावी.
४. विष्‍णुं मुक्तये (विष्णू): मोक्ष किंवा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी भगवान विष्णूंची भक्ती करावी.
५. शिवं ज्ञानाय (शिव): आत्मज्ञानासाठी आणि सत्य समजून घेण्यासाठी भगवान शंकराची उपासना करावी.
६. शिवां बुद्धिविवृद्धये (शक्ती/देवी): बुद्धीच्या विकासासाठी आणि विवेक जागृत करण्यासाठी आदिशक्तीची (पार्वती/शिवा) पूजा करावी.

तुम्ही हे ५ आशीर्वाद तुमच्या मुलांना रोज देता का? नाही? मग आजपासूनच करा सुरुवात!

हे मागणं का मागावं? तर...

जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा आपली मानसिकता एका 'मागणीदारा'ची (Beggar) असते. आपण ईश्वराशी सौदेबाजी करतो. पण विचार करा, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले आहे, त्याला तुमचे घर, गाडी किंवा पैशांच्या गरजा माहित नाहीत का? नक्कीच आहेत! पण तो आपल्याला त्या पलीकडचे काहीतरी देऊ इच्छितो.

१. अडथळे आणि पापमुक्ती:

आपल्या प्रगतीत सर्वात मोठे अडथळे आपले 'प्राक्तन' आणि 'पाप' असतात. म्हणून गणपतीकडे विघ्नहर्ता म्हणून आणि सूर्याकडे पापविनाशक म्हणून प्रार्थना करावी. जेव्हा पाप आणि अडथळे दूर होतात, तेव्हा प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होतो.

२. ज्ञान आणि बुद्धी:

पैसा असूनही जर बुद्धी नसेल, तर तो पैसा टिकत नाही. म्हणून भगवान शंकरांकडे 'ज्ञान' आणि देवीकडे 'तीव्र बुद्धी' मागावी. हे दोन गुण असतील तर तुम्ही जगात कुठेही सुखी राहू शकता.

Astro Tip: रात्रभर कुस बदलताय? शनिवारी उशाशी ठेवा 'ही' वस्तू; झोपेच्या गोळ्यांची गरज भासणार नाही!

३. अंतिम ध्येय - मोक्ष:

सगळी सुखं उपभोगल्यानंतरही शेवटी मन अशांतच राहते. ही अशांती कायमची मिटवण्यासाठी भगवान विष्णूंकडे 'मुक्ती' किंवा 'मोक्ष' मागावा. हेच मानवी जीवनाचे अंतिम सार्थक आहे.

Web Title : किस भगवान से क्या मांगें: विष्णु का जीवन बदलने वाला रहस्य।

Web Summary : देवताओं से विशिष्ट आशीर्वाद मांगना आध्यात्मिक विकास को बढ़ाता है, न कि केवल भौतिक लाभ को। गणेश से बाधा हटाने, सूर्य से शुद्धि, शिव से ज्ञान, देवी से बुद्धि और विष्णु से मुक्ति के लिए प्रार्थना करें, प्रार्थनाओं को दैवीय उद्देश्य के साथ जोड़ें।

Web Title : What to ask from which God: Vishnu's secret to change life.

Web Summary : Seeking specific blessings from deities enhances spiritual growth, not just material gains. Pray to Ganesha for obstacle removal, Surya for purification, Shiva for knowledge, Devi for wisdom, and Vishnu for liberation, aligning prayers with divine purpose.