अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट? असे आहे महत्त्व; भविष्य कळते, महात्म्यही मोठे, पाहा मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:29 IST2026-03-20T14:26:58+5:302026-03-20T14:29:04+5:30

Ring Finger: अनामिका बोटावरून बरीच चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. महती, महत्त्व जाणून घ्या...

which finger is the ring finger this is its importance see the recognition of anamika | अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट? असे आहे महत्त्व; भविष्य कळते, महात्म्यही मोठे, पाहा मान्यता

अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट? असे आहे महत्त्व; भविष्य कळते, महात्म्यही मोठे, पाहा मान्यता

Ring Finger: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. डोक्याच्या केसांपासून ते तळपायापर्यंत मानवी शरीर अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात यातील अनेक गोष्टींवरून व्यक्तिमत्व, स्वभाव, भविष्यातील घटना, गुण-दोष यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आताच्या घडीला अनामिका बोटावरून चर्चा सुरू आहे. अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट? ज्योतिषशास्त्रानुसार अनामिका बोटाचे महत्त्व काय आहे? अध्यात्मिकदृष्ट्या अनामिका बोटाची महती काय? जाणून घेऊया...

हिंदू धर्मात अनामिका बोटाला अत्यंत पवित्र आणि सात्त्विक मानले जाते. या बोटाचा थेट संबंध 'सूर्य' ग्रहाशी असल्याने यश, कीर्ती आणि आत्मविश्वासाचे ते प्रतीक मानले जाते. धार्मिक पूजेत गंध, हळद-कुंकू लावणे, अक्षता वाहणे, पवित्रक धारण करणे, यासाठी हे बोट श्रेष्ठ मानले जाते. 

अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट?
 
नाम ओढण्यासाठी करंगळी वापरली जात नाही. शास्त्रांमध्ये कोणत्याही शुभ कार्यासाठी ती निषिद्ध मानली जाते. करंगळी शेजारी अनामिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बोटामुळे मानसिक शक्ती मजबूत होते. हे बोट सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार, या बोटाने देव, गुरू किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावावा. या बोटाने नाम लावल्याने मानसिक ऊर्जा वाढते आणि आज्ञाचक्र जागृत होते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा येते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते.

नामिका बोटाची नस ही हृदयाशी जोडलेली असते

असे म्हणतात की अनामिका बोटाची नस ही हृदयाशी जोडलेली असते. हे बोट हाताच्या सर्वात लहान बोटापेक्षा म्हणजे करंगळीपेक्षा थोडे लांब असते. सूर्याचे स्थान अनामिका बोटाच्या तळाशी आहे. सहसा हे बोट मधल्या बोटापेक्षा लहान असते. परंतु अनेक लोकांच्या हातात या बोटाची लांबी आणि आकार सामान्य बोटापेक्षा वेगळा असू शकतो. हस्तरेषाशास्त्रानुसार, अनामिका बोटाची लांबी, रुंदी, गोलाकारपणा आणि आकार पाहून आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो.

कालिदासांनी अनामिका असे केले नामकरण

कालिदास हे संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ कवी. आपल्या करंगळीच्या बाजूच्या बोटाला अनामिका नाव पडण्यामागे कवि कालिदास कारणीभूत आहेत, असे मानले जाते. कारण, ज्या वेळेस विद्वानांच्या नावांची यादी करायची ठरली, तेव्हा पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले, त्यानंतर त्यांच्या तोडीस तोड विद्वान कोणता याचा विचार होऊ लागला, पण तेवढी साहित्यिक ऊंची कोणाही साहित्यिकाला गाठता आली नाही, म्हणून ती यादी तिथेच थांबली आणि करंगळीच्या बाजूचे बोट विद्वानाच्या नावासाठी पारखे राहिले, म्हणून ती ठरली अनामिका!

साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते? 

साखरपुड्यात वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा जोडपे एकमेकांना अंगठी घालतात तेव्हा ते हाताच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकामध्ये घालतात. प्राचीन इजिप्तमध्ये अंगठी घालण्याची सुरुवात झाली. त्यानंतर अंगठी घालण्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, ज्या आजही सुरू आहेत. इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते. याचा अर्थ असा की, या बोटाची तार थेट हृदयाशी जोडली जाते. या कारणामुळे लोक या बोटात अंगठी घालू लागले. 

 

Web Title : अनामिका उंगली: महत्व, भविष्य और सांस्कृतिक मान्यताएं जानिए

Web Summary : अनामिका उंगली का हिंदू धर्म में सांस्कृतिक और ज्योतिषीय महत्व है। सूर्य से जुड़ी यह सफलता और आत्मविश्वास का प्रतीक है। धार्मिक अनुष्ठानों में इसका उपयोग होता है और माना जाता है कि यह सीधे हृदय से जुड़ी है, इसलिए सगाई की अंगूठी इसी उंगली में पहनी जाती है।

Web Title : Ring Finger: Significance, Future Insights, and Cultural Importance Explained

Web Summary : The ring finger holds cultural and astrological importance in Hinduism. Linked to the Sun, it symbolizes success and confidence. It's used in rituals and believed to connect directly to the heart, explaining why engagement rings are worn on this finger.