गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:56 IST2025-10-01T15:49:20+5:302025-10-01T15:56:03+5:30
Vijaya Dashami Dasara 2025 Swami Seva: यंदा गुरुवारी विजयादशमी दसरा आला आहे. या दिवशी केलेली स्वामी सेवा अतिशय शुभ पुण्य फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते.

गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
Vijaya Dashami Dasara 2025 Swami Seva: नवरात्राची सांगता होत आहे. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने अवतार घेत नऊ दिवस युद्ध केले. दशमीला महिषासुराचा वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. यंदा, गुरुवारी ०२ ऑक्टोबर २०२५ दसरा आहे. या दिवशी कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे विजयादशमी साजरी करत असताना श्री स्वामी समर्थ स्मरण आवर्जून करावे.
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. गुरुवारी कोट्यवधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात. गुरुवारी केलेली स्वामी सेवा, पूजन, नामस्मरण उपासना विशेष मानली जाते. गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. दसरा विजयादशमी या दिवशी स्वामी सेवा करावी अन् काही गोष्टी स्वामींसाठी नक्की कराव्यात, असे सांगितले जाते.
४ कामे करा, विश्वास ठेवा, अशक्य शक्य होईल । Dussehra 2025 Swami Seva
- गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा.
- दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी.
- तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वांत प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर १ जपमाळ म्हणजे १०८ वेळा तारक मंत्रांचा जप करावा.
- चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही, तर तिन्हीसांजेला दिवेलागणीला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी.
- अगदीच काही नाही, ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रांचा १०८ वेळा (१ जपमाळ) किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा.
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
- सकाळी लक्ष्मी देवीचे पूजन करावे. तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी लक्ष्मी देवी, स्वामींसमोर दिवा लावावा. तुळशीपाशी दिवा लावावा.
- शक्य असेल तर सकाळी, सायंकाळी किंवा दिवसभरात एकदा लक्ष्मी देवीचे श्रीसुक्त, कनकधारा स्तोत्र अवश्य म्हणावे. लक्ष्मी मंत्रांचा मनापासून जप करावा.
- शक्य असेल तर सायंकाळी स्वामी, लक्ष्मी देवीची आरती करावी.
- स्वामींवर दृढ विश्वास आणि अपार श्रद्धा ठेवा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥